Devayani Farande Politics: आमदार देवयानी फरांदे यांचा संताप; माझ्याविषयी ड्रग्सचे खोटे नॅरेटिव्ह पसरवले!

BJP MLA Devayani Farande took notice of the opponents: भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या अपप्रचाराबाबत व्यक्त केला संताप.
Devyani Pharande & Vasant Gite
Devyani Pharande & Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

Devayani Farande News: विधानसभा निवडणूक झाल्यावर नवनिर्वाचित आमदारांनी पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर आणि विरोधकांवर शरसंधान केले. बंडखोरांविषयी या बैठकीत आक्रमक चूर आळवण्यात आला.

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच आता भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काल या संदर्भात सर्व आमदारांनी एकत्र येत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. यावेळी निवडणुकीत झालेल्या प्रचाराबाबत हे आमदार नाराज असल्याचे दिसले.

Devyani Pharande & Vasant Gite
Chhagan Bhujbal Politics: अखेर छगन भुजबळ यांनी मान्य केला जरांगे पाटील इफेक्ट, म्हणाले...

आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांच्या बाबत आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या मी त्यांना पक्षात आणले त्यांच्या मुलाला उपमहापौर केले.

तरीही त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. बंडखोरी केली. माझ्या विरोधात निवडणुकीत खोटा प्रचार केला. शहरातील ड्रग्स रॅकेट विषयी त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांनी वातावरण बिघडले. अशा गद्दार आणि बंडखोरांना पुन्हा पक्षात घेऊ नये असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Devyani Pharande & Vasant Gite
Mahayuti Government Formation: मुख्यमंत्री शपथविधीची तारीख ठरली! नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

भाजपच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांसह विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विधानसभा निवडणुकीत झालेल्या बंडखोरी बाबत नाराजी व्यक्त केली. ज्या लोकांनी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना पक्षाने पुन्हा थारा देऊ नये. त्यांच्यासाठी पक्षाची दारे बंद करण्यात यावीत.

पक्ष ज्या नेत्यांना सर्वकाही देतो, तेच बंडखोरी करतात. माजी नगरसेवकांनी देखील पक्षाविषयी जाण ठेवली नाही. विरोधकांना मदत केली. कार्यकर्ते मात्र प्रामाणिकपणे काम करत होते. त्यामुळे आता माजी नगरसेवकांना सोडून कार्यकर्त्यांना नगरसेवक कसे करता येईल, याचा विचार केला पाहिजे. असे या वेळी विविध आमदार आणि सदस्यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे पक्षाला आता कार्यकर्त्यांची आठवण झाली, असे चित्र दिसले.

एकंदरच महापालिका निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. महापालिकेची मुदत २०२२ मध्ये संपली. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने या निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. सर्व महापालिकांवर प्रशासक आणि युक्त केले.

या कालावधीत प्रशासकांनी अनेक संशयास्पद आणि वादग्रस्त कामे केल्याची तक्रार आहे. आता महापालिकांचा कारभार लोकनियुक्त सदस्यांच्या हाती यावा, यासाठी सत्ताधारी भाजपनेच दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक संपताच लवकरच महापालिका निवडणुका होणार याची चाहूल लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com