Navi Mumbai : गणेश नाईकांचा मंदा म्हात्रेंशी पुन्हा पंगा, मतदारसंघातही ठरतायत वरचढ

BJP News : वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. यातच नाईक यांनी म्हात्रे यांच्याशी पुन्हा पंगा घेतला आहे.
Sarkarnama
mandatai mhatre - ganesh naiksarkarnama
Published on
Updated on

BJP News : वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे वैर सर्वश्रुत आहे. यातच नाईक यांनी म्हात्रे यांच्याशी पुन्हा पंगा घेतला आहे. म्हात्रे यांच्या बेलापूर मतदारसंघातील करावे गावात 19 लाख लीटर क्षमता असलेल्या जलकुंभाच्या भूमिपूजन समारंभाला नाईक यांनीच हजेरी लावली आणि कुदळही मारून घेतली. या कार्यक्रमाला म्हात्रे यांना आमंत्रणही देण्यात आले नसल्याची माहिती आहे.

नाईक आणि म्हात्रे यांच्यामधून विस्तवही जात नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी तर म्हात्रे यांना तिकीटच मिळू नये म्हणून नाईक यांनी फिल्डिंग लावली होती. पुत्र संदीप नाईक यांना तिकीट मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते. पण वरिष्ठ पातळीवरून म्हात्रे यांनाच तिकीट देण्यात आले. त्यानंतर संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढले. त्यावेळी म्हात्रे यांना पराभूत करण्यासाठी नाईक यांनी सर्व शक्ती पणाला लावल्याचे दिसून आले होते.

Sarkarnama
NCP Sharad Pawar : 3 शनिवार 3 बैठका...; शरद पवारांचा पक्ष तीन टप्प्यात संघटना ढवळून काढणार, काय आहे नेमका प्लॅन?

निवडणुकीत भाजपच्या माजी नगरसेवकांनी संदीप नाईक यांच्यासाठी उघडपणे काम केले. त्यामुळे गणेश नाईक हेच पडद्यामागून सारी सूत्र फिरवत असल्याचे प्रत्येक टप्प्यावर दिसून येत होते. निवडणुकीत म्हात्रे यांच्या अगदी अखेरच्या फेरीत निसटता विजय झाला. पण निवडणूक संपताच संदीप नाईक यांच्यासाठी काम करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकांना गणेश नाईक यांनी पुन्हा पक्षात प्रवेश दिला. यामुळे म्हात्रे समर्थक आणि भाजपचे जुने पदाधिकारी नाराज झाले होते.

Sarkarnama
Eknath Shinde News: एकनाथ शिंदे पुन्हा नाराज..? हेलिकॉप्टरनं अचानक गाठलं दरे गाव; चर्चांना उधाण

आता बेलापूर मतदार संघातील महापालिकेच्या विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्यांमध्ये वनमंत्री गणेश नाईक हेच उपस्थित राहत असल्याचे दिसून येते. करावे गावातील कार्यक्रमावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघात असूनही त्या या कार्यक्रमाला नव्हत्या. अगदी पालिकेचेही अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. नाईक समर्थकांच्या या वागणुकीमुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र यावर नाईक हे वनमंत्री असल्याने राज्यपातळीवरील कोणत्याही कार्यक्रमाला जाऊ शकतात, अशी सारवासारव केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com