Ranjit Kasale: कासले गिरवणार कराडचा कित्ता; पुणे पोलिस अलर्ट; VIDEO व्हायरल

Pune Police Alert Ranjit Kasale Surrender News: पळून काही फायदा होणार नाही.त्यामुळे मी महाराष्ट्र पोलिस आणि बीड पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कासले याने म्हटले होते.
Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik Karad
Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले याने आपल्या विधानांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवली आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर साठी मला सुपारी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करणारे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणजित कासले पोलिसांना शरण येणार असल्याचं समोर आले आहे. कराड ज्या पद्धतीने सोशल मीडियावर पोस्ट करून नंतर पुण्यात पोलिसांना शरण आला होता त्याच पद्धतीने कासले यानेही देखील व्हिडिओ व्हायरल करून पुण्यात शरण येणार असल्याचे सांगितले आहे.

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळवण्याचा दावा करणारा रणजीत कासले हा पोलिसांना शरण येणार असल्याचा दावा करीत आहे. त्याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. यापूर्वी कासले याने मी वीस वर्ष सायबर पोलिसांमध्ये काम केलं आहे. किती प्रयत्न केले तरी मी पोलिसांच्या हाती लागणार नाही, मी रोज दोन गाड्या बदलून सातत्याने लोकेशन बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी किती प्रयत्न केले तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही असा दावा केला होता. मात्र रणजीत कसले आता पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगत आहे.

Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik Karad
Solapur APMC Election 2025: आजी-माजी आमदारांच्या पॅनेलमध्ये लढत: मानेंना 5, हसापुरेंना 4, शिवदारेंना 2 जागा

रणजित कासले याने सोशल मीडिया पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, मी कालपासून माझ्या पोस्टवर आलेल्या कमेंट्स वाचल्या त्यानंतर मी काही पत्रकार मित्र, वकील आणि काही पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर मला असे जाणवले की पळून काही फायदा होणार नाही.त्यामुळे मी महाराष्ट्र पोलिस आणि बीड पोलिसांसमोर सरेंडर होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कासले याने म्हटले होते.

कासले हा आज पुणे पोलिसांना शरण येणार असल्याचे सांगितले जात आहे. आज सायंकाळी साधारण साडेपाचच्या दरम्यान रणजीत कासले हा दिल्लीहून पुणे विमानतळावर येणार असल्याचं माहिती समोर आली आहे. याबाबत पुणे पोलिसांनी देखील खबरदारी घेतली असून कासले जर पुण्यात आला तर त्याला अटक करून आपण बीड पोलिसांच्या हवाली करू असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाची अद्याप आम्हाला कोणतीही कल्पना नसून बीड पोलिसांनी देखील याबाबत आमच्याशी संपर्क साधलेला नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com