Ajit Pawar Politics : उपमुख्यमंत्री अजितदादांचे पक्षावरील नियंत्रण सुटले?

Ajit Pawar Group Is Disgraced In Teachers Election : शिक्षक निवडणुकीत अजित पवारांचे हात दाखवून अवलक्षण ठरले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभा निवडणुकी पाठोपाठ बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दारुण पराभव झाला या निमित्ताने पक्षातील बेबनाव विधानसभेसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

यामध्ये शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर दराडे विजयी झाले.अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या स्थानी होते.त्यांनी ऐनवेळी उमेदवारी करू नये अतिशय जोरदार लढत दिली. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे तिसऱ्या स्थानी राहिले.

या निवडणुकीत धक्कादायक बाब म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार दराडे यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाचे महेंद्र भावसार यांना देखील पक्षाने उमेदवारी दिली होती. महिंद्र भावसार यांना अवघी 131 मते मिळाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.

Ajit Pawar
Video Kishor Darade Win : नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे विजयी, ठाकरे गटाला चारली धूळ; विवेक कोल्हेंना किती मते?

पक्षाचा उमेदवार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ, अनिल पाटील हे दोन मंत्री आणि नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष या मतदारसंघात होते. याशिवाय पक्षाचे आठ आमदार आहेत. या निवडणुकीत दगा फटका होईल अशी शंका होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे स्वतः नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेऊन प्रचाराच्या सूचना केल्या होत्या. पक्षाचे अनेक पदाधिकारी व आमदार उघडपणे त्याचा प्रचारात होते.

Ajit Pawar
Kishor Darade: विजयानंतर किशोर दराडे मुख्यमंत्र्यांना म्हणाले, 'साहेब, तुमचा शब्द खरा ठरवला!

एकंदर विधानपरिषदेची ही निवडणूक विधानसभेसाठी देखील उपमुख्यमंत्री पवार यांना संदेश देऊन गेली आहे. या पक्षातील आमदार सैरभैर असल्याचे स्पष्ट दिसले. अनेक पदाधिकारी पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत. वरिष्ठ नेत्यांचे मंत्री आणि आमदारच ऐकत नाहीत.

त्यामुळे कार्यकर्तेही त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा स्थितीत आगामी निवडणुकीत हा पक्ष काय आणि कसा प्रभाव दाखवणार? हा चर्चेचा विषय आहे. अत्यंत नगण्य अशी 131 मते मिळाल्याने ह्या पक्षाने हात दाखवून अवलक्षण केले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com