निवडणूक लांबणीवर पडली तरी गाफील राहू नका!

भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला.
BJP leaders welcoming Girish Mahajan
BJP leaders welcoming Girish MahajanSarkarnama

नाशिक : ओबीसी (OBC) आरक्षण शिवाय निवडणुका घेऊ नये , अशी भाजपची (BJP) भूमिका आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून मे महिन्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक लांबणीवर पडणार असली तरी गाफील राहू नका, असा सल्ला गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजपच्या इच्छुक व कार्यकर्त्यांना दिला.

BJP leaders welcoming Girish Mahajan
PM Modi In Pune Live : मोदीजी आले, अरे हो, इलेक्शन आले ; राष्ट्रवादीनं उडवली खिल्ली

श्री महाजन यांचे शनिवारी शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. प्रभारीपदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते शहरात येत असल्याने पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

BJP leaders welcoming Girish Mahajan
एकनाथ खडसे सतततच्या पराभवाने खचले आहेत!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गिरीश महाजन यांची नाशिकच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. शनिवारी महाजन यांनी पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारला. या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भाजप सत्ताकाळात महापालिकेत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने नाशिककर समाधानी आहे. सत्तेच्या पहिल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. परंतु, शिवसेनेचे सरकार आल्यानंतर महापालिकेच्या विकासकामांमध्ये खोडा घालण्याचे काम झाले. परंतु, केंद्रात भाजपची सत्ता असल्याने त्या माध्यमातून मोठे प्रकल्प दिले.

ते पुढे म्हणाले, नाशिकमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालकमंत्री छगन भुजबळ लक्ष देत आहे. परंतु असे असेल तरी नाशिककरांच्या मनामध्ये कमळ आहे. राज्य सरकार विविध स्तरावर अपयशी ठरले आहे. नाशिकशी माझे जवळचे संबंध असल्याने प्रत्येकाला ओळखतो. त्यामुळे कामगिरी लक्षात घेऊन उमेदवारी देईन, असे सांगितले.

यावेळी ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने, लक्ष्मण सावजी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप यांची भाषणे झाली. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले . येथील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दिनकर पाटील, नगरसेवक सतीश सोनवणे, भगवान दोंदे, राकेश दोंदे, मुकेश शहाणे, सुप्रिया खोडे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com