Nashik News : महापालिका रुग्णालयाला शिवसेनेनं दिला कंदील भेट, 'हे' आहे कारण!

Balasaheb Thackeray Hospital Nashik : ठाकरे गटातील नेते आणि विविध पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे.
shivsena thackeray group gifted lantern balasaheb thackeray hospital
shivsena thackeray group gifted lantern balasaheb thackeray hospitalsarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 29 May : नाशिक शहरातील महापालिकेचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) रुग्णालय वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. सोमवारी ( ता. 27 ) येथे घडलेला प्रकार धक्कादायक होता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते चांगलेच संतापले आहेत. सध्या राज्यभर प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशातच शेकडो रुग्ण उपचार घेत असलेल्या महापालिकेच्या ठाकरे रुग्णालयात सोमवारी चक्क सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. दिवसभर वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतरही रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यावर काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे शेकडो रुग्णांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या आणि या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आधीच वेदना, त्यात उकाड्याची भर पडली. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी तसेच रुग्णांनी डॉक्टरांना वारंवार तक्रार करूनही काहीही उपाययोजना झाली नाही. सकाळी आठला वीजपुरवठा खंडित झाला. तो रात्री दहाला पूर्ववत झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. रुग्णालय हे अतिशय तातडीची सेवा असतानाही येथे सलग 14 तास वीजपुरवठा खंडित राहिल्यावर प्रशासन काय करीत होते? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी केला. या प्रकाराचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला कंदील भेट दिला.

shivsena thackeray group gifted lantern balasaheb thackeray hospital
Nashik Crime News: धक्कादायक, नाशिकमध्ये सुरू आहे बनावट नोटांची छपाई?

महापालिकेच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात सातत्याने तक्रारी असल्याने येथे रोजच वेगवेगळी आंदोलने होत असतात. अनेक नगरसेवक याबाबत प्रशासनाला धारेवर धरत असतात. एवढे होऊनही रुग्णालयातील सेवा आणि सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेल्या नाही. त्यामुळे राजकीय पक्ष त्यांचे नेते आणि प्रशासन यांच्यातील वाद नित्याचाच बनला आहे. मात्र, मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी कंदील भेट दिल्याने त्यांचे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.


( Edited By : Akshay Sabale )

shivsena thackeray group gifted lantern balasaheb thackeray hospital
Devayani Farande News : मध्य नाशिकच्या आघाडीवर ठरणार आमदार फरांदे यांचे भवितव्य? वाढलेली मतदान टक्केवारी डोकेदुखी ठरणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com