Uddhav Thackeray Video : मोठी बातमी! हेलिपॅडवर बॅगांची तपासणी, उद्धव ठाकरेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची झाडाझडती

Election officials Checking of Uddhav Thackeray bags :उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेमध्ये त्यांच्या बॅगांची तपासणी झाली असल्याचे सांगितले, तसेच जे अधिकारी तुमची तपासणी करतात त्यांची देखील तुम्ही चौकशी करा,असे आवाहन केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे हॅलिकाॅप्टरने सभेसाठी वणी येथे आले होते. त्यावेळी हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी केली. हेलिकाॅप्टरमधील बॅगची तपासणी करताना उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ काढत निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.

आपल्या बॅगची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी त्यांचे नाव आणि ते मुळचे कुठले असल्याचे विचारले. तेथे असलेल्या एका कर्मचाऱ्याने तो मध्य प्रदेशचा असल्याचे सांगितले. त्यावेळी गुजरातचे नाही ना. महाराष्ट्रात तपासयला पण बाहेरच्या राज्यातील लोकं आहेत, असे म्हटले.

Uddhav Thackeray
Jitendra Awhad : महायुतीची जाहिरात बघितली, मुस्लिमांची टोपी नाही; जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'केंद्र सरकार हे...'

'तु्म्ही आधी कोणत्या नेत्याची बॅग तपासली हे सांगा. मिंधे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांची बॅग तपासली का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्याला केला. त्यावेळी अधिकाऱ्याने आपण चार महिने झाले येथे आलो आहोत. अजून आपण कुठल्याच नेत्याची बॅग तपासली नसल्याचे सांगितले. तसेच मोदी येथे सभेला आले नाहीत असे म्हटले. त्यावेळी ज्यावेळी ते सभेला येतील त्यावेळी त्यांची बॅग तपासून त्याचा व्हिडिओ मला पाठवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिकाऱ्यांचे खिसे तपासा

उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेमध्ये त्यांच्या बॅगांची तपासणी झाली असल्याचे सांगितले, तसेचजे अधिकारी तुमची तपासणी करतात त्यांची देखील तुम्ही चौकशी करा. त्यांचे ओळखपत्र, नियुक्तीपत्र तपासा. ते तुमचे किसे तपासता तसे तुम्हीही त्यांचे खिसे तपासा. तो तुमचा अधिकारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यंत्रणेला सांगतोय मी रागलोय नाही. माझी बॅग तपासली तशी मोदी शाहाची बॅग तपासली का? मिंधेची तपासली का? अजित पवार यांची तपासली का? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारला.

Uddhav Thackeray
Rupali Chakankar: नोटीस पॅालिटिक्स: सुप्रिया सुळेंचा दावा खोटा; 'ती' नोटीस कुणाला? चाकणकरांची पुन्हा स्पष्टोक्ती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com