Ram Shinde Vs Sujay Vikhe : विखे-शिंदे दिलजमाईत 'मेख'च होती! शिंदेंची विखेंसाठी पळापळी 'फेक'च होती?

Ahmednagar Lok Sabha Election News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सुजय विखे यांच्या पाठोपाठ आमदार प्रा. राम शिंदे आणि लोकसभा समन्वयक प्रा. भानुदास बेरड इच्छुक होते. केंद्रीय समितीसमोर या दोघांच्या मुलाखती देखील झाल्या होत्या.
ram shinde sujay vikhe
ram shinde sujay vikhesarkarnama

Ahmednagar Political News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी आमदार प्रा. राम शिंदे यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. खासदरकीसाठी इच्छुक असताना देखील सुजय विखे यांचे काम करण्याची वेळ भाजप आमदार शिंदेवर आली. पक्षादेशानुसार आमदार शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात पळापळी केली पण, ती फळाला आली नाही. त्यामुळे आमदार शिंदे यांची ही पळापळ वरकरणी होती की, मनापासून, याची भाजप आणि विरोधकांमध्ये संशोधनाची विषय ठरली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सुजय विखे यांच्या पाठोपाठ आमदार प्रा. राम शिंदे आणि लोकसभा समन्वयक प्रा. भानुदास बेरड इच्छुक होते. केंद्रीय समितीसमोर या दोघांच्या मुलाखती देखील झाल्या होत्या. केंद्रात मात्र मंत्री विखे यांनी वजन वापरून पुत्र सुजयसाठी पहिल्या यादीत उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे आमदार शिंदे आणि बेरड तिकीटाच्या रेसमधून बाहेर पडले. विखे आणि शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून आणि नगरमधील कोणापासून लपलेला नव्हता. त्यामुळे आमदार शिंदे निवडणुकीत सुजय विखे यांचे काम करणार का? याकडे लक्ष लागले.

आमदार शिंदे सुरवातीला प्रचारापासून दूर होते. सुजय विखे त्यांच्या पूर्वीच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात असल्यावर आमदार शिंदे वेगळेच कुठे असायचे. त्यामुळे आमदार शिंदे प्रचारात दिसत नव्हते. परंतु शेवटच्या टप्प्यात पक्षादेश आला आणि आमदार शिंदे मैदानात उतरले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यानी दिलजमाई यशस्वी शिष्टाई केली. नेत्यांची मने जुळली. मात्र कार्यकर्त्यांची जुळली नाहीत. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यामुळे म्हणावा तेवढा प्रभाव पडला नाही आणि कर्जत-जामखेडमधून सुजय विखे यांचे मताधिक्य घटल्याचे निकालाहून स्पष्ट झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतांचा टक्का घसरला

विधानसभा 2019 मध्ये आमदार शिंदे यांनी आपल्या पराभवाला विखे कारणीभूत असल्याचे जाहीरपण म्हटले होते. त्यामुळे आमदार शिंदे आणि विखे यांच्यात संघर्ष पेटला होता. हा संघर्ष पक्षातंर्गत विकोपाला पोहोचला होता. त्यामुळे विखे आणि शिंदे हे दोघे अंतर बाळगून राहत होते. पक्षात नगर दक्षिणमध्ये विखे आणि शिंदे, असे दोन गट दिसत होते. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात तुतारीने आघाडी घेत भाजपच्या बालेकिल्याला पुन्हा एकदा सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंकेंना कर्जत-जामखेडमध्ये 1 लाख 4 हजार 963 मते मिळाली. विखेंनी 95 हजार 835 मते घेतली. यानुसार लंके यांना 9 हजार 128 मतांचे मताधिक्य मिळाले. विखे यांना 2019 मध्ये याच विधानसभा मतदारसंघाने विखेंना 1 लाख 5 हजार 236 मते दिली होती.        

ram shinde sujay vikhe
Nilesh Lanke : खासदार लंकेंच्या पीएवर प्राणघातक हल्ला, विखे-लंकेंचे कार्यकर्ते भिडले

स्वीय सहाय्यकांचा तोरेबाजपण भोवला

सुजय विखेंनी यावेळी लोकसभेचा गड सर करण्यासाठी प्रवरेची यंत्रणा कार्यान्वित केली होती. तिथेच ते फसले. लोकांमध्ये न जाता प्रवरेच्या यंत्रणेत ते गुंतले. तसेच कोरोना काळात मतदारसंघात उपलब्ध न होणे, संपर्कासाठी ताटकळत बसणे, अडचणीच्या काळात कॉल न घेणे तसेच मतदारसंघात आल्यास मोजक्याच कार्यकर्त्यांच्या सानिध्यात राहीले. तसेच स्वीय सहाय्यकांचा मनमानी आणि तोरेबाज कारभार देखील काहीअंशी कारणीभूत ठरणाल्याचे निरीक्षक राजकीय विश्लेषण व्यक्त करत आहेत.

आमदार पवारांची ऐनवेळी साथ

दुसरीकडे नीलेश लंके यांचे साधे वागणे, बोलण्याची गावरान भाषा, दिसला की गाडी थांबवणे, वार्तालाप करणे मतदारांना जास्त भावला. संपर्कासाठी मोबाईल लावला की उत्तर देणारा स्वभाव मतदारांसह स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात बसला. कोरोना काळात पारनेर मतदारसंघात त्यांचे लोकाभिमुख कार्य त्यांच्या मताधिक्याला वाढ देणारा निश्चितच ठरला. यातच शेवटच्या टप्प्यात आमदार रोहित पवार यांची मोलाची साथ लंके यांना मिळाली. रोहित पवारांनी बारामतीतून नगरमध्ये येत त्यांची यंत्रणा लंकेंच्या बाजूने उभी केली. परिणाम कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून लंके यांना मताधिक्य मिळाले.

ram shinde sujay vikhe
Radhakrishna Vikhe V/S Balasaheb Thorat : मोठ्या विखेंनी 'शरम' काढली अन् थोरातांनी 'पुत्रा'चा बाजारच उठवला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com