Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay RautSarkarnama

शिवसेनेत लवकरच माजी आमदाराच्या प्रवेशाची चर्चा

कमालीची उत्सुकता; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले
Published on

सिडको : नाशिक महापालिका (NMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. भाजप (BJP) व इतर पक्षाच्या तुलनेत शिवसेना (Shivsena) पक्षाने बहुतांश कामात कमालीची आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच एका माजी आमदाराचा शिवसेना प्रवेश होणार आहे.

Shivsena leader Sanjay Raut
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच, धर्मभास्करला लाजवेल असा ५० कोटींचा घोटाळा!

या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे कळते. प्रवेशामुळे शिवसेनेतील इनकमींग जोमात आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना कार्यालयाबाहेर फटाक्यांची चांगलीच आतषबाजी बघायला मिळणार असल्याच्या चर्चेला सध्या कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले आहे.

Shivsena leader Sanjay Raut
डीपीडीसी बैठक; कोरोनाने भुजबळ-कांदे वादाची हवाच काढून घेतली!

कोरोना पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका होतील किंवा नाही, अशी अटकळ कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत असताना राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तयारीला लागा अशा प्रकारचा आदेश नुकताच दिल्याचे दिसून आले. त्यामुळे नाशिककरांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे प्रभागरचनेची. असे असले तरी नाशिकमध्ये शिवसेना मात्र गेल्या काही महिन्यांपासून आधीच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

महिला- पुरुष, युवक- युवती शाखांचे उद्‌घाटन, जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश, दुबार नावांचा घोटाळा, विविध विकासकामांचे उद्‌घाटन, मंत्री राणे यांच्या वादग्रस्त विधानावरून दाखल झालेला गुन्हा व त्यामुळे नाशिक शहरात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण आणि आता शिवबंधन कार्यक्रमाचा सपाटा सुरू आहे. असे असताना आता मात्र लवकरच एका माजी आमदाराचा पक्षप्रवेश मोठ्या थाटामाटात होणार असल्याच्या चर्चेला सध्या कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले आहे.

हा माजी आमदार नेमका कोण व कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. असो असे असले तरी इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना पक्ष मात्र नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चढत्या आलेखाच्या भूमिकेत दिसून येतोय एवढं मात्र नक्की.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com