Shivsena Politics : हेमंत गोडसेंनी दिले खासदार वाजेंना सडेतोड उत्तर !

Hemant Godse On Rajabhau Waje : नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम मार्गी लागले आहे.रेल्वे बोर्डाने यासाठी सोळा हजार 39 कोटींचा डीपीआर तयार केला.या डीपीआर मध्ये काही त्रुटी होत्या.
Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje, Hemant GodseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक- पुणे हाय स्पीड रेल्वे बाबत विविध दावे केले जात आहेत. या संदर्भात ठोस निर्णय होऊ शकलेलं नाही. असा दावा करण्यात आला होता. या प्रकल्पाबाबत राज्य शासनाकडून निर्णय झालेला नाही. संबंधित फाईल राज्य शासनाकडे पडून आहे. ती मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवावी, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केली होती.

त्याला माजी खासदार हेमंत गोडसे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. संबंधित प्रकल्पाची फाईल यापूर्वीच केंद्र शासनाला सादर करण्यात आलेली आहे, असा दावा माजी खासदार गोडसे यांनी केला. त्यामुळे आता नाशिक-पुणे रेल्वे वरून नवे राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. नाशिक पुणे प्रस्तावित लोहमार्ग वेगाने व्हावा, तसेच हा मार्ग परिपूर्ण असावा यासाठी मी स्वतः रेल्वे बोर्डाचे प्रशासन आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची वारंवार भेट घेतली आहे. या प्रकल्पाचा डीपीआर 17 हजार 889 कोटी रुपयांचा आहे. तो केंद्र शासनाला सादर करण्यात आलेला आहे.

Rajabhau Waje, Hemant Godse
Congress Politics : काँग्रेसच्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता

केंद्र शासनाच्या 2024-25 या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 2 हजार 500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर काहीच ठोस काम झाले नाही, असा दावा करणे योग्य नाही. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यासाठी मी मनापासून काम केलेले आहे. त्यामुळे या विषयावर राजकारण करणे योग्य वाटत नाही, असा टोमणा खासदार गोडसे यांनी लगावला.

या प्रकल्पाबाबत मी संसदेत (Lok Sabha) आवाज उठविला होता. केंद्र शासनाचे या विषयावर लक्ष वेधले. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम मार्गी लागले आहे. रेल्वे बोर्डाने यासाठी सोळा हजार 39 कोटींचा डीपीआर तयार केला. या डीपीआर मध्ये काही त्रुटी होत्या. आता सविस्तर आणि परिपूर्ण असा डीपीआर मध्य रेल्वे कडून तयार करून घेण्यासाठी मी स्वतः लक्ष घातले. त्यासाठी पाठपुरावा केला त्याला यश आले आहे.

केंद्र शासनाकडे आता सादर झालेला हा 17 हजार 889 कोटी रुपयांचा डीपीआर लवकरच मंजूर होईल,अशी अपेक्षा आहे. महिन्याभरापूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद देखील केली आहे. हा मार्ग तयार झाल्यावर नाशिक होऊन अवघ्या दोन तासात पुण्याला पोहोचता येईल असे गोडसे म्हणाले.

Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje News : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी खासदार वाजे 'Action Mode'वर!

या निमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या महिनाभरातच नाशिक मतदार संघातील विकास कामांवरून राजकारण सुरू झाले आहे. विद्यमान खासदार वाजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यालयाशी संपर्क करून या प्रश्नावर कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करावा, अशी मागणी ही केली होती. मात्र आता माजी खासदार गोडसे यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे हा वाद थांबतो की आणखी पुढे जातो याची उत्सुकता आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com