Onion 40 Percent Export Duty : कांद्यावर निर्यात शुल्क शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी; भारती पवारांचा दावा

Bharti Pawar On Onion Export: यानुसार तुम्ही कांदा एक्सपोर्ट करू शकत नाही, पण इतर राज्यात विकू शकता,
Bharti Pawar On Onion Export
Bharti Pawar On Onion ExportSarkarnama

Nashik Onion Farmer News: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने नाशिकमधील सर्व बाजार समित्यांमधील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. पण कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठीच घेतल्याचा अजब दावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला आहे.

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. पण सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला नाही, पण चुकीचा प्रचार सुरू आहे. निर्यात बंदी झालेली नाही, जर मागणी वाढली असेल तर त्या प्रमाणात पुरवठाही झाला पाहिजे. आता कांद्यासाठी जी घरगुती (देशांतर्गत) मागणी आहे. त्या मागणीसाठी आपल्याकडून जाणारा कांदा कमी प्रमाणात पुरतोय त्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे, अस स्पष्टीकरण डॉ. भारती पवार यांनी दिले आहे.

Bharti Pawar On Onion Export
Arvind Kejriwal News : मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीला मुख्यमंत्री केजरीवाल उपस्थित राहणार

यानुसार तुम्ही कांदा एक्सपोर्ट करू शकत नाही, पण इतर राज्यात विकू शकता, असंही पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या देशातील लोकांची काळजी घेणे गरजेचं आहे. म्हणून आपल्याच देशात कांदा विका, असं सरकारचं म्हणणं आहे. ज्यावेळी देशात कांद्याचं उत्पन्न पुरेशा प्रमाणात झालेले असते आणि आपण बाहेरच्या देशात कांद्याला चांगला भाव मिळतो त्यावेळी सरकार एक्सपोर्ट खुली करते. मी खासदार झाल्यापासून निर्यात खुलीच आहे. सरकारने कधीच बंद केलेली नाही.

कांद्याची इतर राज्यात मागणी वाढली आहे. देशाला कांदा पुरला पाहिजे, जर देशातच कांदा पुरला नाही तर बाहेरून कांदा मागवावा, म्हणून हा निर्णय घेतला आहे. निर्यात खुली आहे. पण काही प्रमाणात कर लावला आहे. कांद्याचे दर कमी झाले की शेतकऱ्यांची देखील चिंता वाढते. कांद्यावरील निर्यात शुल्काच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत मी मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिणार आहे. पण विरोधक चुकीच्या पद्धतीने भडकवत असल्याचा आरोपही राज्यमंत्री पवार यांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com