Fadnavis and Vikhe News : बाळासाहेब विखेंचे स्वप्न पूर्ण करण्याची फडणवीसांची ग्वाही!

Ahmednagar Lok Sabha Constituency : महायुतीचे नगरचे उमेदवार खासदार सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची सभा झाली,
Fadnavis and Vikhe
Fadnavis and VikheSarkarnama

Loksabha Election 2024 : "लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते व पाणीपरिषदेच्या माध्यमातून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या त्यांच्या प्रकल्पाची सुरुवात युती सरकारच्या काळात आपण केली होती. त्यामुळे आता नगर-नाशिक-मराठवाड्याचा पाणी वाद मिटावा, यासाठी या प्रकल्पांसह कुकडी व साकळाई प्रकल्प पूर्ण करून येत्या 5 वर्षात दुष्काळी भाग जलमय केला जाईल", अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महायुतीचे नगरचे उमेदवार खासदार सुजय विखे व शिर्डीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी संत निरंकारी भवनशेजारील मैदानावर आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाविजय संकल्प सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Fadnavis and Vikhe
Lok Sabha Election 2024: दहशतवाद, सीमेबाहेरून ट्विट, मुस्लिमांना आरक्षण; PM मोदींनी व्यक्त केली भीती

2014 व 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या याच मैदानावर झालेल्या सभांच्या गर्दीचे रेकॉर्ड आजच्या सभेने मोडला आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, "नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने आता ते प्रत्यक्षात येईल. मोदींच्या जादूमुळे माझ्या जन्माच्या आधीपासून सुरू झालेला निळवंडे प्रकल्प मोदींमुळेच पूर्ण झाला. चार प्रमुख राष्ट्रीय महामार्ग नगरला जोडले आहेत. चार एमआयडीसी होत आहेत. यामुळे नवे उद्योजक येतील आणि रोजगार मिळेल. औद्योगिक जिल्हा होईल".

तसेच, सीएम सोलर योजनेतून येत्या 18 महिन्यात प्रत्येक शेतकर्‍याला दिवसा 12 तास 365 दिवस वीज दिली जाणार आहे. शिर्डीत नवे एअरपोर्टही केले जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, बाबूशेठ टायरवाले यांची भाषणे झाली. नगरचे खासदार सुजय विखे(Sujay Vikhe) यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचा कार्य अहवाल व सिद्धी संकल्प अहवाल (व्हीजन डॉक्युमेंट) यांचे प्रकाशन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Fadnavis and Vikhe
Nashik Constituency Election : हेमंत गोडसेंच्या प्रचारात रंग भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे होणार सक्रीय!

मंत्री विखेंच्या या मागणीकडे वेधले लक्ष -

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कुकडी आणि साकळाई पाणी योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याने आता प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच पश्चिम वाहिनीचे पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोर्‍याचा नगर-नाशिक, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र परिसर दुष्काळमुक्त करण्याची मागणी मंत्री विखेंनी केली.

विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत -

शिर्डीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे(Sadashiv Lokhande) यांनी घाटमाथ्यावरून वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी अडवून त्यापैकी 25 टीएमसी पाणी नगर जिल्ह्याला देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. नगर मतदार संघाचे उमेदवार खासदार सुजय विखे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सर्वांच्या सहकार्याने राबवल्या असल्याने यंदाच्या लोकसभेत मी अहिल्यानगरचा खासदार म्हणून प्रवेश करेल, असा विश्वास व्यक्त केला.

राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात. पण विरोधकांकडून विकासाचे मुद्दे मांडले जात नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पाच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेची उमेदवारी दिली आणि ती पाच वर्षात मी सार्थ काम केले. त्यामुळे देशाचा पंतप्रधान आणि नगरचा खासदार बदलणार नाही. मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होतील व मी दुसर्‍यांदा खासदार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही लढाई विकासाची, देश हिताची, देशाच्या संरक्षणाची व सर्वसामान्यांच्या पाठबळासाठीची आहे, असेही खासदार सुजय विखे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com