Nashik Crime : 'त्या' 9 महिन्यांत पोलीस पत्नीची वर्दी घालून त्याने अनेकांना गंडवले, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Man Impersonates Police Officer Using Wife’s Uniform : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश घालून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
Nashik Crime
Nashik Crime Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश घालून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नाशिकसह इतर काही ठिकाणीही त्याने फसवणुकीचे प्रकार केल्याचे समोर आले आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीचे नाव सागर पवार असल्याची माहिती आहे.

सागर पवारविरोधात यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर कारवाई झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पत्नीचा गणवेश वापरून तो स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवत होता. या बनावाच्या आधारे त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

पत्नीच्या पोलिस वर्दीचा गैरवापर करून सागर पवार स्वतःला उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. तो गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळ्यात ओढले आणि अटक केली. आता या प्रकरणी त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

Nashik Crime
Girish Mahajan Politics : ..तर मैत्रीपूर्ण लढती होतील, महाजनांनी गोडीगाडीत स्पष्टच सांगून टाकलं...

सागर पवार आपल्या पत्नीच्या पोलिस वर्दीचा वापर करून स्वतःला उपनिरीक्षक म्हणून सादर करत होता. तो पोलिस असल्याचा बनाव करून महिलांची फसवणूक करत असे. विविध ठिकाणी फिरून त्याने पोलिसात ओळख असल्याचा दिखावा केला. काहींना नोकरी मिळवून देण्याचे, तर काहींना गुन्हेगारी प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवले. त्याच्यावर आधीपासूनच अनेक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिस वर्दीचा आणि सिस्टिमचा गैरवापर करून त्याने पोलिस यंत्रणेलाच गंडवले. तो सतत ओळख लपवत राहत होता आणि पोलिस असल्याचा मुखवटा घालून लोकांची दिशाभूल करत होता.

सागर पवारने पोलिस वर्दीतील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘सहा. पोलिस निरीक्षक’ आणि ‘पोलिस उपनिरीक्षक सागर पवार’ अशा बनावट नेमप्लेटचा वापर केला होता. यामुळे त्याने सामान्य नागरिकांमध्ये स्वतःला अधिकृत पोलिस अधिकारी असल्याची चुकीची प्रतिमा निर्माण केली. या बनावाच्या माध्यमातून त्याने आर्थिक लाभ घेण्याचे तसेच सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्याच्याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याने फिर्यादी पत्नीला धमकावले, मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकीही दिली होती. (nashik crime)

Nashik Crime
Girish Mahajan Politics: संकट मोचक गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेची केलेली गणेश गीते यांची घरवापसी का रखडली?

गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार सुनील आहेर, परमेश्वर दराडे आणि पोलिस अंमलदार तेजस मते यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर साळुंखेनगर, अंबड परिसरात सापळा लावण्यात आला. सागर पवार पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पथकाने वेळीच पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने बनावट पोलिस अधिकारी असल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला अंबड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com