Girish Mahajan Politics : ..तर मैत्रीपूर्ण लढती होतील, महाजनांनी गोडीगाडीत स्पष्टच सांगून टाकलं...

BJP Leader Girish Mahajan Statement on Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसह महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.
Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुका भाजपसह महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून महायुती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर, याविषयी राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहेत.

कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढू असं सांगितल जात असलं तरी सर्वच पक्षांमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आता भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

मंत्री महाजन म्हणाले, स्थानिकच्या निवडणुकांसाठी महायुतीमधील जागा वाटपाचा अंतिम निकष अजून ठरलेला नाही. त्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मात्र ज्या जागांवरील उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढले आणि विजयी झाले, त्या जागा आमच्याच राहतील. सामंजस्याने तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असं महाजन यांनी स्पष्टच सांगितलं.

महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात एकमत आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. आमच्या नेत्यांनीही तसेच जाहीर केले आहे. मात्र अगदीच तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा आहे, असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan Politics: संकट मोचक गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठेची केलेली गणेश गीते यांची घरवापसी का रखडली?

अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे एकनाथ शिंदे व पक्षातील नेते यांच्यात नाराजी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर विचारले असता, महाजन यांनी तसे काही नसल्याचे म्हटले. ते म्हणाले कुठेही नाराजी नाही. नाराजी केवळ माध्यमांमधून दिसते. नुकतीच महायुतीच्या सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली.

मी स्वत: त्या बैठकीला उपस्थित होतो. थोडीफार कुरबुर ही सर्वच पक्षांमध्ये असते. ती आमच्या पक्षात आणि मित्र पक्षांमध्येही आहे. पण नाराजी नाही. प्रत्यक्षात महायुतीमधील सर्वच घटक एकजुटीने काम करत आहेत, असेही मंत्री महाजन यांनी नमूद केले.

Girish Mahajan & Eknath Shinde
Manikrao Kokate Politics: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मार्गात भाऊबंदकीचा अडसर, सख्ख्या भावाकडूनच मिळणार आव्हान!

एकनाथ खडसे म्हणतात की गिरीश महाजन हा माझा कार्यकर्ता होता. यावर विचारले असता महाजन म्हणाले, बरोबर आहे. मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. मी गल्लीपासून, वार्डापासून भाजयुमोचा मी कार्यकर्ता होतो. नंतर शहराचा कार्यकर्ता झालो नंतर तालुक्याचा झालो. नंतर जिल्ह्याचा नंतर राज्याचा झालो. हे ९० साली आले मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com