Onion Rate Issue
Onion Rate IssueSarkarnama

Onion Rate Issue: राज्यात कांद्याचा प्रश्न पेटला : केंद्राने जाहीर केलेला भाव मिळेना; शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव

Nashik Onion Farmer News: केंद्र सरकारने कांद्याला जाहीर केलेला दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटलचा भाव कुठेय ?
Published on

Nashik Farmer News: कांद्याचे भाव गडगडल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने धाव घेत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच तब्बल दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याचीही घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. तर दुसरीकडे बाजार समितीच्या लिलावात १५०० ते १७०० रुपयांचे दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत येवल्यात गुरुवारी लिलाव बंद पाडले.

नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत कांद्याचा केंद्र शासनाचा २ हजार ४१० रुपयांचा भाव कुठे आहे ?, असा सवाल केला. केंद्र सरकारने जाहीर केलेला २ हजार ४१० रुपयांचा कांद्याचा भाव फक्त दाखवण्यापुरताच आहे का?, हा भाव देणारी यंत्रणा कुठेय?, कांदा कोण खरेदी करणार ? १५००-१६०० रुपयांनी कांदा विकत आहे, तर शासन निर्यात मूल्य का शून्य करत नाही, यासह अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला विचारले.

Onion Rate Issue
Swabhimani Shetkari Sanghatana: कांद्याच्या निर्यातीवरील शुल्कावरून 'स्वाभिमानी' आक्रमक; राहुरीत शुक्रवारी करणार 'चक्काजाम'

केंद्र शासनाने निर्यात मूल्य वाढवल्यामुळे चार दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समितीत लिलाव ठप्प झाले. त्यातच बुधवारी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी मध्यस्थी करत कांदा खरेदीचे आश्वासन दिल्याने आज कांदा लिलाव सुरू झाले. मात्र, आश्वासन फक्त बातम्या पुरतेच ठरल्याचे आजच्या कांद्याच्या भावावरून लक्षात आले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी येवल्यात लिलाव बंद पाडले.

Onion Rate Issue
Raju Shetti News : कारखानदार लोकसभा-विधानसभेला पैसा उधळतील ; राजू शेट्टींनी उपसले आंदोलनाचे हत्यार

२ हजार ४१० रुपयांचा दर सरकारने जाहीर करूनही कृषी उत्पन्न बाजार समितीत १५०० ते १७०० रुपये या दराने व्यापाऱ्यांकडून कांदे खरेदी करण्यात येत असल्याने नगर -मनमाड महामार्गावर धाव घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर रस्ता रोको आंदोलन केले.

नाफेडचा दर न मिळाल्याने आक्रमक झालेले शेतकरी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर बसून असल्याने सुमारे एक तास दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसात मंत्री छगन भुजबळ यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊन लिलाव पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती सभापती किसन धनगे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com