Swabhimani Shetkari Sanghatana: कांद्याच्या निर्यातीवरील शुल्कावरून 'स्वाभिमानी' आक्रमक; राहुरीत शुक्रवारी करणार 'चक्काजाम'

Onion Rate Issue : राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर 'स्वाभिमानी' रास्ता रोको आंदोलन कऱणार
Swabhimani Shetkari Sanghatana
Swabhimani Shetkari SanghatanaSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: नाशिक नंतर कांदा पट्ट्यात येणाऱ्या नगर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर सुरुवातीपासून आक्रमकपणे आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सर्वात आधी राहुरी येथे कांदा खरेदी आणि लिलाव बंद पाडत या आंदोलनाला शेतकऱ्यांच्या आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याने आंदोलनास मोठे स्वरूप दिले.

त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी सर्वच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी विविध संघटना आणि पक्षांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत आंदोलन सुरू ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून आता शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana
Raju Shetti News : कारखानदार लोकसभा-विधानसभेला पैसा उधळतील ; राजू शेट्टींनी उपसले आंदोलनाचे हत्यार

केंद्र सरकारने कांद्यावर घोषित केलेला 40 टक्के निर्यात कर रद्द करावा, सरकारने कांद्याची खरेदी किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने करावी आणि कांद्यावर सरकारने काही महिन्यांपूर्वी घोषित केलेले 350 रुपयांचे अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, या मागण्यांसाठी 'स्वाभिमानी'ने रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.

जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत राहील, असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com