Tipu Sultan Statue Case Dhule : एमआयएमच्या माजी आमदाराला खंडपीठाचा दणका, राजद्रोहाचा गुन्हा रद्दची याचिका फेटाळली

AIMIM ex-MLA Farukh Shah’s plea to quash sedition case rejected by Aurangabad bench of Bombay High Court : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात जून २०२३ मध्ये एका चौकात टिपू सुलतान यांचे स्मारक उभारल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार फारूख शाह यांच्याविरोधात देशद्रोह व इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Court Hammer
Court Hammer Sarakarnama
Published on
Updated on

ex-MLA Farukh Shah : धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात जून २०२३ मध्ये एका चौकात टिपू सुलतान यांचे स्मारक उभारल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार फारूख शाह यांच्याविरोधात देशद्रोह व इतर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फारूख शाह यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज केला होता. मात्र खंडपीठाने शाह यांची याचिका फेटाळली असून त्यांना दणका दिला आहे.

माजी आमदार फारुख शहा यांनी चाळीसगाव रोड परिसरात एका चौकात बेकायदेशीररित्या टिपु सुलतानचे स्मारक बांधले होते. त्यावरुन भाजयुमोचे अध्यक्ष अॅड. रोहित चांदोडे यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शहा यांच्याविरोधात तक्रार केली होती. चांदोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माजी आमदार फारुख शहा यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १५३ अ (धार्मिक भावना भडकावणे), १९५ अ, ५०४ (शांतता भंग करण्याचा हेतूने अपमान करणे), ५०६ (गुन्हेगारी धमकी), १२४ अ (राजद्रोह), १२० ब (गुन्हेगारी कट), ४०४३४ तसेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट प्रॉपर्टी अॅक्टच्या कलम ३ व ४ नुसार १९ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल असलेली फिर्याद रद्द करण्यासाठी माजी आमदार फारुख शहा यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमुर्ती विभा कनकनवाडी, न्यायमुर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावली झाली. टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांचे नाव देणे गुन्हा नाही. तसेच, आमदार निधीतून हे काम करताना शासनाची परवानगी घेतल्याचा बचाव शहा यांच्या वकिलांनी केला.

Court Hammer
Girish Mahajan Politics : गणेश गितेंना गिरीश महाजनांचा आशीर्वाद, विरोध झुगारून करणार भाजपमध्ये 'कमबॅक'

याप्रकरणी अॅड. रोहित चांदोडे यांच्या वतीने अॅड. चेतन चौधरी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी फारुख शहा यांच्या वकीलांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत स्पष्ट केले की, कोणत्याही चौक, रस्ता अथवा सार्वजनिक स्थळाला नाव देण्यासाठी महापालिकेच्या सभागृहात ठराव संमत होणे गरजेचे असते. केवळ आमदाराच्या निर्णयावरून असे बदल करता येत नाहीत. (Dhule news)

Court Hammer
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ म्हणतात, ठाकरे बंधू एकत्र येणे सध्या तरी कठीण... हे आहे कारण!

याचबरोबर, आमदार निधीचा वापर या बेकायदेशीर बांधकामासाठी केला गेला का, हाही प्रश्न अॅड. चेतन चौधरी यांनी युक्तीवादा दरम्यान उपस्थित केला. उच्च न्यायालयाने बचाव पक्षाने सादर केलेले पुरावे आणि अॅड. चौधरी यांचा युक्तिवाद विचारात घेऊन फारूख शाह यांची याचिका फेटाळून लावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com