Girish Mahajan Politics : गणेश गितेंना गिरीश महाजनांचा आशीर्वाद, विरोध झुगारून करणार भाजपमध्ये 'कमबॅक'

Ganesh Gite to join BJP again with Girish Mahajan's backing : स्थायी समितीचे माजी सभापती व शरद पवार गटाचे नेते गणेश गिते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.
Ganesh Gite & Girish Mahajan
Ganesh Gite & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan Politics : स्थायी समितीचे माजी सभापती व शरद पवार गटाचे नेते गणेश गिते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. आजच त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण गिरीश महाजन देखील आज नाशिकमध्ये असणार आहेत.

गणेश गिते हे पूर्वी भाजपमध्येच होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजप सोडली. ते राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षात गेले. शरद पवार यांनी त्यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. भाजपचे राहुल ढिकले यांच्याविरोधात गणेश गिते यांचा सामना झाला. त्यात गणेश गिते यांचा पराभव झाला. मात्र बंडखोरी करुन गिते यांनी ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवल्याने ढिकले यांचा गिते यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. याशिवाय इतरही काही जणांचा गणेश गिते यांना पक्षात घेण्यास विरोध आहे.

त्यामुळे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्याबरोबरच त्यांचा होणारा भाजप प्रवेशाचा मुहूर्त हुकला होता. मात्र भाजपाचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे रविवारी नाशिकमध्ये येणार असून त्याचवेळी गणेश गिते यांच्यासह त्यांच्यासमवेत येणाऱ्या दहा ते बारा माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. किंवा सोमवारी देखील या पक्षप्रवेशाचा मुहुर्त निघू शकतो.

Ganesh Gite & Girish Mahajan
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ म्हणतात, ठाकरे बंधू एकत्र येणे सध्या तरी कठीण... हे आहे कारण!

दरम्यान यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मात्र यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलं आहे. गिते हे राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्या प्रवेशाविषयी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची गरज भासली नसावी. असा टोला केदार यांनी लगावला आहे. त्यामुळे आजूनही स्थानिक पातळीवर गणेश गिते यांना पक्षात घेण्यास एकमत झाल्याचे दिसत नाही.

Ganesh Gite & Girish Mahajan
Kunal Patil Politics: कुणाल पाटील पाऊणशे वर्षांची काँग्रेसची बांधिलकी तोडणार, भाजप प्रवेश निश्चित!

परंतु अन्य पक्षातून भाजपात येणाऱ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्यामुळे गिते यांचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे. शिवाय गिते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे स्थानिक पातळीवर विरोध असला तरी बडगुजर यांच्याप्रमाणे त्यांचाही पक्षप्रवेश अटळ असल्याचे बोलले जात आहे. गणेश गिते हे महाजन यांच्यासोबत आधी यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. गिते यांनीही विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आपला भाजपात प्रवेश होईल, तसे संकेत गिरीश महाजन यांच्याकडून मिळाल्याचे माध्यमांना सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com