Khadse Reply To Opponents : भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी सत्ताधारी एकत्र आले; एकनाथ खडसेंचा पलटवार

Jalgaon DPC Meeting : गेल्या १५ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी जळगाव जिल्ह्यात आहे.
Eknath Khadse News
Eknath Khadse NewsSarkarnama

Jalgaon News : सार्वजनिक बांधकाम विभागात न झालेल्या कामांची बिले निघतात. जळगाव शहरात या विभागाकडून झालेली रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. यासंबंधी विधानपरिषदेत मी लक्षवेधी मांडली, त्यावर चर्चेची मागणी केली असता मंत्री हजरच राहिले नाही. आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी सर्व एकत्र आले आहेत, असा पलटवार राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांवर केला. (Rulers came together to back a corrupt official : Eknath Khadse allegition)

जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंगेश चव्हाण आणि अन्य आमदारांनी खडसे अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विरोधकांवरच गंभीर आरोप केले. 'सरकारनामा'शी बोलताना खडसे म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी जळगाव जिल्ह्यात आहे. ‘मविआ’चे सरकार असताना आम्ही त्यांची बदली केली. मात्र, सत्तांतरांनतर ‘महायुती’च्या सरकारने पुन्हा या अधिकाऱ्याला जिल्ह्यात आणले.

Eknath Khadse News
BJP MLA Serious Allegation On Khadse : एकनाथ खडसे अधिकाऱ्यांना ‘ब्लॅकमेल’ करतात; भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा गंभीर आरोप

विविध कामांच्या निविदा काढताना त्या जादा दराने काढल्या. अनेक कामे न करताही बिले काढली गेली. त्यात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला. याबाबतची माहिती मिळण्यासाठी मी वारंवार मागणी केली. जळगाव, धरणगाव, भडगाव तसेच जळगाव शहरातही अशा प्रकारची कामे झाली. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी माझ्या विरोधात एकत्र येतात, हे लाजीरवाणे आहे, असेही खडसे यांनी नमूद केले.

Eknath Khadse News
Solapur Politics : सोलापूरच्या नेत्यांना झालंय तरी काय? काल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आज भाजपत हमरीतुमरी

जळगाव जिल्ह्याच्या विकासाची चिंता असेल तर जिल्ह्यातील ठेकेदारांची तीनशे कोटींची बिले प्रलंबित आहेत ती रक्कम मिळण्यासाठी सत्तेतील लोकप्रतिनिधींनी आपले वजन वापरावे, असा टोलाही खडसेंनी विरोधकांना लगावला हेाता.

Eknath Khadse News
Dhananjay Munde On Onion Issue : कांदा निर्यातीवरील शुल्कवाढीस कृषिमंत्री मुंडेंचा विरोध; म्हणाले ‘मी उद्याच दिल्लीला जातोय...’

खडसेंवर काय आरोप केले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे हे विरोधी पक्षाच्या बळावर जळगाव जिल्ह्यातील विकास थांबवितात. त्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर आरोप करतात आणि त्यांना ‘ब्लॅकमेलिंग’ करतात, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केला होता. तसेच, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप, शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या निषेधाचा ठरावही मंजूर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com