Sagar Jadhav
Sagar JadhavSarkarnama

Nashik Crime: गँगवॉरने नाशिक शहर हादरलं; मध्यरात्री गुन्हेगारांत गोळीबाराचा थरार, आमदार समर्थक गुंड जखमी!

Firing in Nashik; Gang war for revenge among criminal gangs, political favor for criminals, criminal injured -शहरात खुनाचे सत्र, राजकीय आशीर्वादाने नाशिक शहरात गुन्हेगारी फोफावली!
Published on

Nashik Firing News: भाजपच्या माजी नगरसेवक आणि समर्थकांनी महिनाभरापूर्वी भर दिवसा हत्या केली. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा समर्थक गोळीबारात जखमी झाला आहे. नाशिक शहरात राजकीय आशीर्वादाने गुन्हेगारी वाढत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.

खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या भाजप माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. नांदूर नाका येथे राहुल धोत्रे या युवकाचा सशस्त्र हल्ल्यात निर्घुण खून झाला होता. त्यामध्ये हल्ला करणारे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आरोप धोत्रे कुटुंबीयांनी केला होता.

ही घटना ताजी असतानाच पंचवटीत काल मध्यरात्री पुन्हा गोळीबार झाला. निकम आणि वाघ या गुन्हेगारी टोळीकडून हा गोळीबार झाला. यामध्ये सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असलेल्या गुन्हेगारावर गोळीबार झाला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला.

Sagar Jadhav
Girish Mahajan : 'मी अजून तरुणच, म्हातारा नाही', आमदार देवयानी फरांदेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन कार्यकर्त्यांसमोरच म्हणाले...

पंचवटीतील राहुल वाडीत मध्यरात्री साडेबाराला हा प्रकार घडला. बाळासाहेब वाघमारे यांच्या अंत्ययात्रेसाठी जाधव त्या भागात गेला होता. त्यावेळी किरण निकम टोळीशी संबंधित विकी उत्तम वाघ आणि यांनी हल्ला केला. योगेश वाघमारे याने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.

Sagar Jadhav
Girish Mahajan : गिरीश महाजनांचे सुप्रिया सुळेंना आव्हान, सत्तेत होता तेव्हा काय केले?

जखमी वाघ याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत विविध सूचना केल्या.

यासंदर्भात सराईत गुन्हेगार किरण निकम याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्ये प्रकरणी सागर जाधव याला अटक झाली होती. नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. हा बदला घेण्यासाठी निकम आणि वाघ टोळीने त्याच्यावर काल मध्यरात्री गोळीबार केला, असे बोलले जाते.

या गोळीबारात जखमी झालेल्या सागर जाधवचा शहरातील आमदाराशी निकटचा संबंध असल्याचे बोलले जाते. त्याच्या विरोधात धमकावणे खंडणी वसुली आणि प्राणघातक हल्ला करणे यांस विविध गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती.

नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी आणि सहा महिन्यात पस्तीसहून अधिक खून झाले आहेत. विरोधात शिवसेना आणि मनसे पक्षाने मोर्चा काढला होता. पोलिसांच्या अकार्यक्षमते विरोधात राजकीय पक्षांनी आंदोलन केले. मात्र पोलीस गुन्हेगारीला नियंत्रित करू शकलेले नाहीत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com