नाथाभाऊंच्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे उद्या काय बोलणार?

Eknath Shinde : बंडामध्ये मुख्यमंत्री शिंदेंना जळगाव जिल्हयाने शंभर टक्के साथ दिली आहे.
Eknath Khadse, Eknath Shinde Latest News
Eknath Khadse, Eknath Shinde Latest Newssarkarnama

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात उद्या (ता. २० सप्टेंबर) सभा होणार आहे.

राज्यात शिवसेना फुटलेली असतांना जळगाव जिल्हयाने शिंदे यांना शंभर टक्के साथ दिली. जिल्ह्यातील चारही शिवसेनेचे व एक शिवसेना पुरस्कृत मुक्ताईनगरचे अपक्ष आमदारही शिंदे गटात सहभागी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. (Eknath Khadse, Eknath Shinde Latest News)

Eknath Khadse, Eknath Shinde Latest News
शिंदे गटात गेलेल्या 'या' आमदार, मंत्र्यांना सत्ता काही मानवेना...

जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनाफुटीत मोठा पाठींबा मिळाला. शिवसेनेचे जळगाव ग्रामीणचे आमदार व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील आमदार किशोर पाटील, चोपडयाच्या आमदार लताताई सोनवणे व मुक्ताईनगरचे अपक्ष व शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेतून शिंदे गटात सामिल झाले होते.

Eknath Khadse, Eknath Shinde Latest News
नरकात गेलेला माणूसही रामदास कदमांसारखं बोलणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने सुनावले...

शिवसेनेचे सर्व आमदार शिंदे गटात गेल्यामुळे मोठे खिंडार पडले आहे. त्यानंतर राज्यात सत्तातंर होवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिंदे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात मुख्यंमत्री शिंदे यांची सभा होणार आहे. या ठिकाणी शिदे यांना पाठींबा देणारे शिवसेना पुरस्कृत आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. शिवाय गुलाबरावांच्या मतदारसंघातील पाळधी येथेही एका उपक्रमाचा शुभारंभही मुख्यंमत्री शिंदेंच्य हस्ते होणार आहे. यामुळे मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेकडेच जनतेचे लक्ष असणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी संयुक्तसभा मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठीच घेतली होती, तर आता सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासाठीच सभा घेतआहेत, हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com