Nashik News; सुहास कांदेंच्या मतदारसंघात पाच माजी आमदारांनी फुंकले रणशिंग!

आधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठविण्याचे आमदार सुहास कांदे यांना आवाहन
Ex Mla Rajendra Deshmukh, Pankaj Bhujbal & Anil Aher
Ex Mla Rajendra Deshmukh, Pankaj Bhujbal & Anil AherSarkarnama

नांदगाव : (Nashik) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघातील (Nandgaon) पाच आमदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रणशिंग फुंकले. आमदार कांदे यांनी या प्रश्नावर विधीमंडळात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. (MLA Suhas Kande shall raise Onion growers issue in Assembly)

Ex Mla Rajendra Deshmukh, Pankaj Bhujbal & Anil Aher
Nashik News; अहो पडळकर, सांगा आता मुके, बहिरे कोण हो?

शेतकऱ्यांच्या कापूस व कांद्याला योग्य बाजार भाव मिळावा या मागणीसाठी येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे मतदार संघातील माजी आमदार पंकज भुजबळ, ॲड. जगन्नाथ धात्रक, ॲड. अनिल आहेर, राजाभाऊ देशमुख, संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

सध्या विधिमंडळाच्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय उठऴली. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवावा असे आवाहन तालुक्यातील या पाच माजी आमदारांनी विद्यमान आमदार कांदे यांना केले.

या आंदोलनामुळे येवला रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती तर लिलावाच्या कामकाजावर परिणाम झाला. आंदोलनादरम्यान माजी आमदारांनी सुहास कांदे यांच्या कामकाजावर टीकेची झोड उठवली.

Ex Mla Rajendra Deshmukh, Pankaj Bhujbal & Anil Aher
Chhagan Bhujbal News: मुख्यमंत्री म्हणतात मी शेतकरी, मग कांदा प्रश्न सोडवा!

केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांची हेळसांड करीत आहे. दररोज कोसळणाऱ्या कांदा दरामुळे तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आम्ही देखील सत्तारूढ गटाचे आमदार असताना विधिमंडळात स्वतःच्या सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवीत सभागृहाला निर्णय घेण्यास भाग पाडल्याची आठवण माजी आमदार ॲड. आहेर यांनी करून दिली.

ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना नांदगावहून दिल्लीला गेल्यावर शेतकऱ्यांच्या निर्यात धोरणावर कसा निर्णय घेतला याची आठवण माजी आमदार पंकज भुजबळ यांनी करून दिली.

Ex Mla Rajendra Deshmukh, Pankaj Bhujbal & Anil Aher
Shivsena News; शिवसेना ठाकरे परिवाराचीच, कुणाच्या बापाची नाही!

माजी आमदार संजय पवार यांनी आमच्या माजी आमदारांच्या संघटनेत पुढील वर्षी अजून एक सभासद वाढणार असल्याच्या मिश्कल शब्दात खिल्ली उडविली. नायब तहसीलदार श्री कोणकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.

काँग्रेस तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, विनोद शेलार, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, संतोष बळीद, राजेश सावंत, वाल्मीक टिळेकर, राजू लाठे, दादा पगार, बाळासाहेब देहाडराय, राजाभाऊ आहेर, योगिता पाटीलआदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com