Nashik Leopard News : शिवसेना नेते बडगुजर यांच्या कार्यालयात बिबट्या...एक नव्हे तब्बल चार!

Forest Department Rescue Team Catch the Leopard After Two Hours Efforts :दाट वस्तीच्या सिडकोमध्ये आजची सकाळ बिबट्याच्या दर्शनाने घबराट आणि दहशतीत उजाडली.
 Leopard in Nashik
Leopard in NashikSarkarnama

Nashik News : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या भरवस्तीतील व वर्दळ असणाऱ्या कार्यालयात अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात. मात्र, आज सकाळी चक्क बिबट्यानेच या कार्यालयात हजेरी लावली. सुदैवाने या वेळी तेथे कोणीही नव्हते. शहरात विविध भागात तब्बल चार बिबटे असल्याचे बोलले जाते. (Leopard roams in densely populated urban area of CIDCO in Nashik)

नाशिक (Nashik) शहरातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या सिडको भागातील शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या कार्यालय व परिसरात आज बिबट्याचा मुक्तसंचार होता. त्यामुळे नागरिकांची सकाळी दहशतीत गेली. या वेळी बडगुजर आसाम येथे पर्यटनासाठी गेले होते.

 Leopard in Nashik
Maharashtra Politics : आमदार नीलेश लंकेंच्या दिवाळीच्या फराळावेळी राम शिंदेंनी फोडले फटाके!

आज पहाटे शिवसेना महानगरप्रमुख बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या अगदी जवळ आणि त्यानंतर परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसला. या भागातील विविध सीसीटीव्हीमध्ये हा बिबट्या आपला नैसर्गिक अधिवास सोडून बहुदा भक्ष्याच्या शोधात फिरत असल्याचे दिसले. मात्र, दाट लोकवस्तीच्या नागरी जंगलातून त्यावा बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसावा. त्यामुळे तो भरकटल्याचे दिसले.

काही वेळातच ही बातमी व बिबट्यादेखील परिसरातील विविध अरुंद गल्ल्यांतून दिसल्याने घबराट पसरली. नागरिकांनी वन विभाग व पोलिसांना कळविले. त्यामुळे ही पथके दाखल झाली. मात्र, नागरिकांचा प्रचंड गोंगाट व सेफ पॅसेज मिळत नसल्याने गोंधळलेला बिबट्या असा खेळ बराच वेळ सुरू होता. त्यामुळे आजची सकाळ सावतानगर भागातील सिडकोवासीयांसाठी घबराटीची गेली.

आसाम येथे असलेल्या बडगुजर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर या पथकाने आपले काम सुरू केले. या पथकाने बिबट्याला ट्रॅक्युलायझन गनद्वारे भुलीचे इंजेक्शन मारून बिबट्याला सावता नगर येथे पळत असताना बेशुद्ध केले. त्यानंतर या बिबट्याला पकडून घेऊन गेले. त्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान शहरातील मुंबई नाका भागातदेखील एक बिबटया आढळला. त्याला पकडण्याची कार्यवाही सुरू असतानाच सिडको भागातदेखील अन्य बिबटे आढळल्याने या भागात एक नव्हे तर तब्बल चार बिबटे असल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

 Leopard in Nashik
Shevgaon-Pathardi : दिवाळीच्या शुभेच्छा की मतदारांच्या भेटीगाठी; राजळे, ढाकणेंची मत पेरणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com