Maharashtra Politics : आमदार नीलेश लंकेंच्या दिवाळीच्या फराळावेळी राम शिंदेंनी फोडले फटाके!

Nagar district Politics-दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आमदार नीलेश लंके यांनी केला, तर त्याची सांगता आमदार राम शिंदे यांनी केली.
Nilesh Lanke & Ram Shinde at Diwali celebration
Nilesh Lanke & Ram Shinde at Diwali celebrationSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे

MLA Nilesh Lanke Politics : नगर जिल्ह्यात दिवाळी फराळाला राजकीय रंग जरा जास्तच चढला आहे. या फराळामागे राजकीय काटशह देण्याची रणनीती असल्याचे हे लपून राहिलेले नाही. भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाचा प्रारंभ आमदार नीलेश लंके यांनी केला, तर आमदार लंके यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाची सांगता आमदार शिंदे यांनी केली. आमदार शिंदे यांनी या वेळी चौफेर फटाके फोडले. (Political comments in each others Diwali celebration programme in Ahemednagar)

दिवाळी फराळाच्या या कार्यक्रमात या नेत्यांनी विविध राजकीय विधानांच्या फुलबाजा उडवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार नीलेश लंके आणि भाजपचे (BJP) माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी परस्परांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली.

Nilesh Lanke & Ram Shinde at Diwali celebration
Shevgaon-Pathardi : दिवाळीच्या शुभेच्छा की मतदारांच्या भेटीगाठी; राजळे, ढाकणेंची मत पेरणी

या दोन्ही नेत्यांकडे साखर कारखाने नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे विकत घेऊन साखर वापरतो. कमी पडली, तर विवेक कोल्हे आहेतच. शब्दाला आम्ही दोघे पक्के आहोत. त्यामुळे सुरुवात आपणच करणार आणि शेवटदेखील आपणच करणार, असे शाब्दिक फटाके आमदार राम शिंदे यांनी दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात फोडले.

भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (अजित पवार गट) यांचा आज दिवाळी फराळाचा कार्यक्रम रंगला होता. दिवाळी फराळाचा कार्यक्रम नियोजित असल्याने नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हे दोघेही उपस्थित नव्हते. आमदार शिंदे यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाची सुरुवात आमदार लंके यांच्या उपस्थितीने झाली.

आमदार शिंदे यांनी बालुशाही मिठाई भरवून आमदार लंके यांचे तोंड गोड केले. अलीकडच्या काळाच शिंदे-लंके यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. नवरात्र काळात श्री क्षेत्र मोहटा देवीच्या दर्शनाला आमदार लंके यांनी वाहनाचे सारथ्य करत असताना आमदार शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते. नगरच्या राजकारणात अलीकडच्या काळात एकत्र येण्याचे निमित्त हे दोघे शोधत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाला खासदार सुजय विखे यांनी उशिरा हजेरी लावली. यानंतर आमदार शिंदे यांनी लगेचच वाहनातून हंगा (ता. पारनेर) गाठले. तिथे आमदार लंके यांच्या दिवाळी फराळाला हजेरी लावली. आमदार शिंदे यांचे आमदार लंके यांच्याबरोबर फराळ घेतला. दोघांनी एकमेकांचे तोंड गोड केले. या वेळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेदेखील उपस्थित होते.

Nilesh Lanke & Ram Shinde at Diwali celebration
Yavatmal Shivsena : वाघाडी जांब येथे शिवसैनिकाचा भोसकून खून; आरोपी पसार

आमदार राम शिंदे या वेळी म्हटले की, "आमदार लंके हे नवी लोकप्रतिनिधी आहेत. जेव्हा नवीन लोकप्रतिनिधी येतो, त्यावेळी लोकांच्या आपेक्षा खूप असतात. त्या आपेक्षा पूर्ण करण्याचे काम नीलेश लंके करत आहेत. मी आणि नीलेश लंके एकत्र आल्यानंतर बऱ्याच जणांना वाटत आहे, हे एकत्र कसे आले.

जसे दुसरे एकत्र येतात. तसे आम्ही एकत्र आलोत. मी काही बारीक नाही. माजी पालकमंत्री आहे. कोणीच कोणाला बोलू नये, अशी राज्याची आणि जिल्ह्याची संस्कृती नाही. आम्ही एकत्र आलोय, ज्यांना काय अर्थ काढायचा आहे, तो काढावा. फराळ कडू काहीच नाही. सर्व गोडच आहे. आमचा-तुमचा फराळ गोड मग सर्व गोडं होऊ द्या. साखर चांगली वापरली आहे.

Nilesh Lanke & Ram Shinde at Diwali celebration
Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या विचारांची धग कायम ठेवणाऱ्या शिवतीर्थकडे वळली लाखो पावले !

आम्हा दोघांनाही साखर कारखाने नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे विकत घेऊन साखर वापरतो. कमी पडली, तरी विवेक कोल्हे आहेतच. कर्जत-जामखेड, पारनेर हे दुष्काळी छायेतील तालुके आहेत. लोक मोठे करतात, तसे छोटेदेखील करतात. सरकार महायुतीचे आहे. अधिकृत महायुतीची घोषणा झाल्यानंतरच आम्ही एकत्र दिसलो. त्याअगोदर कधी एकत्रो दिसलो का? फोन व्हायचे, पण ती आमच्यातील आमच्यात.

लंकेच्या नियोजनाचे शिंदेंकडून कौतुक

मोहटा देवीच्या दर्शनाचे नियोजन खूपच चांगले होते. हे पाहून भारावून गेलो. आम्हीदेखील निवडणुकीच्या काळात तुळजापूर आणि मोहटा दर्शनाचे नियोजन केले होते, पण आमच्या गाडीत दुसऱ्याचा प्रचार झाला. बसमधून उतरल्याने तेथून पुढचा प्रवास रिक्षा आणि प्रोजेक्ट फुटला, पण नीलेश लंके यांच्या नियोजनात कोणालाही शिरकाव करण्याची संधी नव्हती. जो दर्शन देईल, त्याला देव पावेल, या शब्दांत नीलेश लंकेंच्या नियोजनाचे शिंदे यांनी कौतुक केले.

Nilesh Lanke & Ram Shinde at Diwali celebration
Maratha Reservation : कऱ्हाडला जरांगे- पाटलांची तोफ आज धडाडणार; आरक्षणासाठी मराठा एकवटला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com