Ahmednagar Political News : नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची या दिवाळीत शुभेच्छा देण्याची चढाओढ रंगली. नगर उत्तरेतून विखे-थोरात यांच्या साखर वाटपापासून सुरू झालेली गोड दिवाळी नगर दक्षिणेमध्ये दिवाळी फराळातून राजकीय रंग चढला.
राजकीय नेत्यांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी आता थेट व्यापारी बाजारपेठेत हजेरी लावली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भाजप आमदार मोनिका राजळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे (शरद पवार गट) यांनी पाथर्डीच्या बाजारपेठेत फिरत व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या काही वर्षांपासून राजळे आणि ढाकणे दिवाळीत पाथर्डी शहरातील व्यापारी बाजारपेठेत फिरून शुभेच्छा देतात. यावर्षी राजळे आणि ढाकणे यांनी आपापल्या पद्धतीने बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काही खरेदीदेखील केली. व्यापाऱ्यांशी संवाद साधला. बाजारपेठेतील स्थिती जाणून घेतली. (Latest Political News)
मोनिका राजळे आणि ढाकणे हे व्यापाऱ्यांशी संवाद साधताना बाजारपेठेत फिरत होते. त्यावेळी त्यांचे व्यापाऱ्यांकडूनदेखील स्वागत झाले. काही ठिकाणी या दोघांचा सत्कार झाला. आमदार राजळे यांनी दिवाळी पाडव्यानिमित्ताने शहरातील गरजूंना दिवाळी किराणाचे वाटप केले. या भेटीगाठीतून राजाळे आणि ढाकणेंनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेरणी केल्याची चर्चा आहे.
आमदार राजळे यांच्यासमवेत माणिक खेडकर, अभिय आव्हाड, डाॅ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, कुंडलिक आन्हाड, नितीन एडके, शिवाजी मोहिते, प्रवीण राजगुरू, अर्चना फासे, मंगल कोकाटे, मनीषा घुले आदी उपस्थित होते.
प्रताप ढाकणे यांच्यासमवेत शिवशंकर राजळे, बंडूपाटील बोरुडे, हुमायून आतार, महादेव दहिफळे, सुनील चव्हाण, राजेंद्र गाडे, अक्रम आतार आदी उपस्थित होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.