Cabinet Expansion : राज्य दुष्काळात अन् शिंदेंच्या आमदाराचं मंत्रिपदासाठी पंढरीच्या विठोबाला साकडं; पावणार का...?

Maharashtra Politics News : शिंदे गटाच्या आमदाराची सत्तालोलुपता विठ्ठलासमोरही लपून राहिली नाही.
Pandharpur Kartiki MahaPooja
Pandharpur Kartiki MahaPoojaSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : ''सोन्यारुप्याने मढला मारवाड्याचा बालाजी..., शेतकऱ्याचा इठोबा पानाफुलामध्ये राजी'' बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील या ओळी आहेत. पंढरपूरचा विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, गरिबांचा देव आहे, असे त्या ओळींतून ध्वनीत होते.

याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका आमदाराने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, आपल्याला मंत्रिपद मिळावे, असे साकडे घातले आहे. पावसाअभावी शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. असे असताना शेतकरी, कष्टकऱ्यांचा देव समजला जाणारा विठ्ठल आमदाराला पावेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीय नेत्यांविषयी समाजात फारसे चांगले बोलले जात नाही. याला काही सन्माननीय अपवादही आहेत. आपले वागणे, बोलणे याद्वारे बहुतांश राजकीय नेत्यांनी स्वतःच आपली पत घालवून घेतली आहे. परिस्थितीचे भान ठेवून काय बोलावे हे अनेकांना कळत नाही. पांडुरंग आणि रुक्मिणीमातेने चमत्कार केला तर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि मी मंत्री होईन, असे म्हणत शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या सत्तालोलुपतेचे किळसवाणे प्रदर्शन केले आहे.

आषाढी, कार्तिकीला वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. विठ्ठलाचे रूप डोळ्यांत साठवून वारकरी तृप्त होतात. आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या, कार्तिकीची पूजा उमपुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्याच्या कल्याणासाठी विठ्ठलाला साकडे घालतात. वारकऱ्यांची भावनाही अशीच असते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार गोगावले यांनी सत्तालोलुपतेचे प्रदर्शन करत, मला मंत्री कर असे साकडे विठ्ठलाला घातले आहे. ते सोमवारी (20 नोव्हेंबर) पंढरपूरला गेले होते. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे तारे तोडले.

आमदार भरत गोगावले काय म्हणतात पाहा, ''पांडुरंगाला आमची कणव असेल तर तो मंत्रिमंडळाचा विस्तार करील. पांडुरंगाला काय कोडे पडले आहे, ते सोडव असे आम्ही आता रुक्मिणीमातेला सांगणार आहोत, आता आमच्या हाती काहीही नाही. पांडुरंग आणि रुक्मिणीमातेने चमत्कार केला तरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल...!''

विठ्ठल - रुक्मिणी यांना गोगावलेंच्या मंत्रिपदाचे काय पडले असेल? राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले आहे, अशा परिस्थितीतही गोगावले यांना त्यांच्या मंत्रिपदाची चिंता लागलेली आहे.

Pandharpur Kartiki MahaPooja
Bhandara News : अजितदादांच्या भाषणात घोषणाबाजी करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं

ते पुढे असेही म्हणतात, की पांडुरंगाला आमची कणव असेल तर तो मंत्रमंडळाचा विस्तार करील... पांडुरंग हा कष्टकऱ्यांचा, गरिबांचा देव आहे. ते श्रीमंतांच्या इच्छा का म्हणून पूर्ण करील आणि तेही राज्यात विपरित परिस्थिती असताना? राज्य संकटात असताना या लोकांना केवळ आपल्या मंत्रिपदाची चिंता आहे.

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्यांपैकी आमदार भरत गोगावले हे एक आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गोगावले यांनीही गुवाहीटी गाठली होती. राज्यात जे काही वाचाळ नेते आहेत, त्यात गोगावले यांचाही क्रमांक लागतो. महायुतीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. याबाबत त्यांनी यापूर्वीही जाहीर वक्तव्ये केली आहेत.

पहिल्या विस्तारातच माझे नाव होते. ती संधी हुकली. आता मला मंत्री कराच, अशा अर्थाची विनवणी गोगावले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे अनेक वेळा केली आहे. त्यात गैर असे काही नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारासाठी विठ्ठलाने चमत्कार करावा, ही मागणी हास्यास्पद आहे.

विठ्ठल हा काही चमत्कारासाठी ओळखला जात नाही. वारकरी श्रद्धेने विठ्ठलासमोर लीन होतात. त्यातून त्यांना आत्मिक समाधान मिळते. सर्वांना सुखी ठेव, पाऊस पडू दे, राज्याची प्रगती होऊ दे, असे साकडे विठ्ठलाला घातले जाते. मंत्रिमंडळाचा विस्तार कर आणि मला मंत्री कर, असे साकडे विठ्ठलाला घालण्यापेक्षा आपल्याला गंडवण्यात आले आहे, या वस्तुस्थितीची जाणीव गोगावले यांना होणे गरजेचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com