Sudhir Tambe : पाच राज्यांत काँग्रेसचाच प्रभाव, पण निकालानंतर भाजप..." ; माजी आमदार सुधीर तांबेंचं सूचक विधान

Assembly Election Resullts : ...त्यामुळे राहुल गांधींच्या रूपाने काॅंग्रेस हा पर्याय पुढे येत आहे.
Sudhir Tambe
Sudhir Tambe Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या पाचपैकी चार राज्यांचा रविवारी, तर मिझोरमचा सोमवारी निकाल जाहीर केला जाणार आहे. भाजपसह काँग्रेसकडून या निवडणुकांमधील विजयाचा दावा ठोकला जात आहेत. याचवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांनी सूचक विधान केलं आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालाचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर होईल. यामुळे देशातील महाविकास आघाडी इंडिया धक्का देण्यासाठी भाजप नक्कीच काहीतरी खेळी खेळणार. परंतु, पाच राज्यांतील निकाल हा भाजपला मतदारांचा सूचक इशारा असेल," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

Sudhir Tambe
MLA Rajesh Tope-Lonikar Clashed: जालन्यात राडा, गाडी फोडल्यानंतर टोपे समर्थकांकडून लोणीकरांच्या घरावर दगडफेक...

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या रविवारी जाहीर होईल. एक्झिट पोलचे आकडेदेखील समोर आले आहेत, तर दुसरीकडे निकालावर सट्टाबाजारात तेजीत आहे. भाजप आणि काॅंग्रेसला सट्टाबाजारात पसंती मिळतेय. या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात महाराष्ट्रातून काँग्रेस-भाजपचे नेतेदेखील मैदानात उतरले होते.

त्यामुळे तेथील निकालाबाबत भाजप-काॅंग्रेसचे नेते आखाडे बांधत आहेत. यातच काॅंग्रेसचे माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी निकालावर भाष्य केले आहे. तसेच या निकालाचा परिणाम काहीअंशी लोकसभा निवडणुकांवरदेखील दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे म्हणाले, मी प्रचाराला गेलो नव्हतो. परंतु, घेतलेल्या माहितीनुसार काँग्रेसचा प्रभाव सर्वत्र जाणवला. निकालातदेखील ते निश्चित दिसेल. छत्तीसगड, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल. मध्य प्रदेशमध्येदेखील परिवर्तनाजवळ असू. राज्यस्थानमध्ये काॅंग्रेसचा प्रभाव मतदारांमध्ये दिसत आहे. तिथे 'कांटे की टक्कर', असे दिसेल. निकालापूर्वी आणि नंतर तिथे सत्ताबाजार तेजीत राहील. तरीदेखील मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचीच सत्ता येण्याची अधिक शक्यता आहे, असे माजी आमदार डाॅ. तांबे यांनी सांगितले.

निकालाचा परिणाम लोकसभेवर निश्चित

या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकांच्या निकालाचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर राहील. या पाच राज्यात काॅंग्रेसची सरशी झाल्यावर महाविकास आघाडी इंडिया आणखी मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. त्यामुळे महाविकास आघाडी इंडियाला धक्का देण्यासाठी भाजप नक्कीच काहीतरी खेळी करू शकतो. भाजपकडून लोकांचा भ्रमनिरास झालाय. त्यामुळे राहुल गांधींच्या रूपाने काॅंग्रेस हा पर्याय पुढे येत आहे.

Sudhir Tambe
Tukaram Mundhe : आयएएस तुकाराम मुंढे राहुल द्रविडसारखे 'पिच'वर थांबले असते, तर...

महाराष्ट्रात लोकसभेसाठी 'फॉर्म्युला'

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागा खूप महत्त्वाच्या आहेत. भाजप जसा विचार करत आहेत, तसाच काँग्रेसदेखील विचार करत असेल. जिंकेल असाच उमेदवार द्यावा लागेल. गेल्या निवणडुकीत काॅंग्रेसचे उमेदवार द्वितीय क्रमांकावर राहिले असून, ते आताही जिंकण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी इंडियाने, असा विचार केल्यास महाराष्ट्रात लोकसभेसाठी वेगळे चित्र असेल, असे माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Sudhir Tambe
Shambhuraj Desai : सातारा लोकसभा कोण लढवणार, राष्ट्रवादी, भाजप की शिवसेना ? मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com