Tukaram Mundhe : आयएएस तुकाराम मुंढे राहुल द्रविडसारखे 'पिच'वर थांबले असते, तर...

Tukaram Mundhe : जितकी वर्षे सेवा झाली तितक्याच वेळी मुंढे यांची बदली झाली आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhe Sarkarnama
Published on
Updated on

Administration News : काही आयएएस अधिकाऱ्यांची सातत्याने बदली होत असते. त्यात तुकाराम मुंढे यांचा वरचा क्रमांक आहे. २००५ मध्ये आयएएस झालेल्या मुंढे यांची आतापर्यंत १७ ते १८ वेळेस बदली झाली आहे. तुकाराम मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांच्या समृद्ध सामाजिक जाणिवा, याबाबत कोणालाही शंका असण्याचे कारण नाही. असे असूनही त्यांची सातत्याने बदली का होते? याचे उत्तर त्यांच्या स्वभावात आणि कार्यशैलीत आढळून येते. तुफानी खेळी करण्याच्या नादात अॉऊट होण्याएेवजी राहुल द्रविडसारखे ते 'पिच'वर थांबले असते तर त्यांच्या हातून अनेक ठिकाणी अनेक चांगली कामे झाली असती.

देशाच्या प्रशासकीय यंत्रणेतील आयएएस हे सर्वात मोठे पद आहे. आयएएस होण्यासाठी अनेकजण रात्रीचा दिवस करत असतात. मात्र, सर्वांचेच स्वप्न पूर्ण होत नाही. या पदावर राहून शासकीय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करता येते. योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवणे शक्य होते.

Tukaram Mundhe
Terana Sugar Scam : पवनराजे निंबाळकर, पद्मसिंह पाटील 21 वर्षांनंतर निर्दोष; काय आहे तेरणा साखर घोटाळा ?

लोककल्याणाच्या कामांना गती देता येते, सुधारणा करता येते. एकूण काय तर आयएएस अधिकारी हे प्रशासनाचा कणाच असतात. सरकार आणि प्रशासनात समन्वयाने ते होणे अपेक्षित असते. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना अधिक महत्त्व असते. याचा अर्थ असा नाही की लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीर कामे सांगायची आणि ती अधिकाऱ्यांनी करायची. अधिकारी याला स्पष्टपणे नकार देऊ शकतात.

आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना एखाद्या ठिकाणी नियुक्ती मिळाली, की तेथे ते तीन वर्षे काम करू शकतात. त्यानंतरही त्यांना मुदतवाढ मिळू शकते, मग तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याबाबतीत असे काय झाले की त्यांची जितकी वर्षे सेवा झाली जवळपास तितक्या वेळेस त्यांची बदली झाली ? प्रामाणिक, करड्या शिस्तीचे अधिकारी राजकीय नेत्यांना नको असतात, हे मान्य केले तरी सर्वच राजकीय नेत्यांना ते नको असतात, असे म्हणता येणार नाही. मग मुंढे यांची ज्या ज्या वेळी बदली झाली त्या प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी, राजकीय नेते किंवा सरकारचीच चूक होती काय? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. स्वतः मुंढे हेही त्यासाठी कारणीभूत आहेत. रुजू झाल्यानंतर लागलीच फटकेबाजी करण्याएेवजी त्यांनी राहुल द्रविडप्रमाणे खेळपट्टीवर टिकून बॅटिंग केली असती तर ते धावांचा डोंगर उभा करू शकले असते. म्हणजेच त्यांच्या हातून अनेक लोकोपयोगी कामे झाली असती.

लोकशाही असल्यामुळे लोकप्रतिनिधींना मान द्यावाच लागतो, मग तो सरपंच का असेना. त्याने चुकीची कामे केली असली तरी त्याचा सर्वांसमोर अपमान करून काहीही साध्य होत नाही. त्या गोष्टी कागदावर आणून त्यांचा योग्य असा बंदोबस्त करता येऊ शकतो. काही आयएएस अधिकाऱ्यांनी आपल्याच राज्यात अशा पद्धतीने एेतिहासिक कमे केली आहेत. तशी कामे मुंढे यांना करता आली असती. झाले असे की, ते एका पदावर एक-दीड वर्षापेक्षा कुठेही टिकून राहू शकले नाहीत, मग त्यांच्या प्रामाणिकपणाचा, समृद्ध सामाजिक जाणिवांचा काय उपयोग झाला? होय, हे मान्य करू की राजकीय व्यवस्था, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी वाईट असतात. मग त्याला तोंड देण्यासाठीचे धोरण मुंढे यांना ठरवता आले असते. लोकप्रतिनिधी, नेत्यांना त्यांच्या तोंडावर फाडफाड बोलण्याएेवजी सर्व बाबी कागदांवर घेऊन त्यांना सळो की पळो करून सोडता आले असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Tukaram Mundhe
Chhattisgarh Assembly Election : निवडणूक रद्द करा, आयोगाविरुद्ध गुन्हा दाखल करा; अपक्ष उमेदवाराच्या मागणीने खळबळ...

कर्मचारी, अधिकारी कामचुकार असतात, ते भ्रष्टाचारही करतात. एखादा आयएएस अधिकारी सर्व भ्रष्टाचार मो़डीत काढू शकतो का? याचे उत्तर दुर्दैवाने नाही, असेच आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. त्याची मुळे राजकीय व्यवस्थेत आहेत. लोकांनी स्वच्छ लोकप्रतिनिधी निवडून दिल्याशिवाय ही कीड दूर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सरसकट अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे हा उपाय नाही. किती म्हणून कर्मचाऱ्यांचे निलंबन करणार? आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि त्यात निलंबन झाले तर मग लोकांची कामे कोण करणार? कोणत्याही सरकारला पुन्हा निवडून यायचे असते.

नेत्यांना आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवायचे असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या की ते अशा अधिकाऱ्यांची बदली करणारच. हे चूक की बरोबर हा भाग वेगळा. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन प्रामाणिकपणे काम करणारे अनेक आयएएस अधिकारी राज्यात, देशात आहेत. तुकाराम मुंढे यांनीही अशा पद्धतीने काम केले असते तर ते अनेक सामाजिक, आर्थिक बदलांना कारणीभूत ठरले असते.

(Edited by Sachin Waghmare)

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंवर कारवाई का केली नाही, म्हणत माहिती आयुक्तांचे मुख्य सचिवांना आदेश !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com