Nashik ACB Case :"लाचलुचपत विभागाने माझ्यावर दाखल केलेले गुन्हे अन्याय करण्याच्या दृष्टीने आहेत. पोलिसांनी अशा कारवाया करताना संयम ठेवावा. चुकीच्या पद्धतीने केसेस दाखल करणे चुकीचे आहे. लाचलुचपत विभागाचे माझ्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास लाचलुचपत विभागाच्या अधीक्षकांच्या दालनात जाहीरपणे फाशी घेण्यास तयार आहे", असे आव्हान शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर दिले आहे.
नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या पत्रावरून नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बडगुजर यांच्या विरोधात अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावरून बडगुजर यांनी आव्हान दिले आहे.
या प्रकरणात बडगुजर यांनी एसीबीकडे चौकशीसाठी हजर होण्यासाठी दहा दिवसांचा अवधी मागीतला होता. त्याला एसीबीने नकार देत तीन दिवसांचा कतालावधी दिला आहे. त्यामुळे ही चौकशी केव्हा सुरू होणार, याची उत्सुकता कायम आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यासंदर्भात बडगुजर यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले, "लाचलुचपत विभागाने रविवारी सायंकाळी सातला नोटीस काढली. साडेसातला माझ्या दोन्ही बंगल्यांवर छापा टाकण्यात आला. बंगल्याची पूर्ण झाडाझडती घेतली. त्यापूर्वीच फसवणुकीचे गुन्हे दाखल केले".
ते पुढे म्हणाले, "माझ्यावर आजपर्यंत एकही फसवणुकीचा गुन्हा नाही. साधा अदखलपात्र गुन्हा देखील नोंद नाही. त्यामुळे लाचलुचपत विभागाची कारवाई जिव्हारी लागली. बडगुजर कंपनीच्या स्थापनेनंतर 2006 मध्ये कंपनीतून रिटायर्ड झालो. त्यासंदर्भात करारपत्राची नोंदणी देखील झाली आहे".
"याच संदर्भात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर 2011 मध्ये न्यायालयात निकाल देखील झाला. त्यात स्पष्टपणे कंपनीत माझी नियुक्ती व निवृत्तीचा उल्लेख आहे. तक्रार दाखल करताना ही बाब लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती का ? नाशिक म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचा अध्यक्ष असताना कार्यालय सील करण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पोलिसांना केस मागे घ्यावी लागली.
चुकीच्या पद्धतीने केसेस दाखल करणे चुकीचे आहे. पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी ओढूनताणून केस आणू नये. आता दक्षता समिती किंवा मानवाधिकार आयोगाकडे धाव घेणार आहे", असे बडगुजर यांनी सांगितले.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.