Vikhe Patil News: गणेश कारखाना नव्या संचालक मंडळानेच चालवावा; सभासदांचा कौल विखे पाटलांनी केला मान्य

Ahmednagar Politics: गणेश कारखान्याच्या निवडणुकीत आजी-माजी महसूलमंत्री एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे या निवडणुकीची मोठी चर्चा झाली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता. मात्र, गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचीत संचालक मंडळाने कारखाना चालवावा, आमच्या कराराची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्याकरीता सहकार्याचीच भूमिका राहील, असं स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं.

पूर्वी कोपरगाव तर मतदारसंघ पुनर्रचनेत राहाता तालुक्यात आलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा राज्यभर गाजली. आजी-माजी महसूलमंत्री विखे-थोरात एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे या निवडणुकीची मोठी चर्चा झाली.

अर्थात विखे यांच्या पॅनल विरोधात कोल्हे गटाचे युवा भाजप नेते विवेक कोल्हे यांनी पॅनल उभा केला होता आणि कोल्हे गटाच्या पाठीशी थोरातांनी येत आपली ताकत याठिकाणी पणाला लावली. यात कोल्हे गटाच्या पॅनेलने विखेंच्या गटाचा 18 विरुद्ध एक असा धुव्वा उडवला.

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra Congress: पटोले, चव्हाणानंतर थोरातही रेसमध्ये; झळकले 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर !

वास्तविक गेल्या अनेक वर्षांपाससून गणेश कारखाना विखे यांच्या प्रवरा कारखान्याकडे भाडेतत्वावर कराराने होता आणि हा करार संपत असतानाच निवडणुका घोषित झाल्या. तसेच नव्या करारासाठी विखे यांना परवानगी होती.

मात्र, आता स्वतः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज (दि.24 जून) शिर्डीत बोलताना गणेश कारखान्याच्या सभासदांचा कौल मान्य करत आमचा अधिकार असतानाही नवनिर्वाचित संचालक मंडळानेच कारखाना चालवावा, त्यांना आमची सहकार्याचीच भूमिका राहील, त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या विषयावर पडदा टाकला.

Radhakrishna Vikhe Patil
Nilesh Lanke News : पारनेर नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार लंके पुन्हा ठरले 'शेरास सव्वाशेर'

दरम्यान, गणेश कारखाना निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच शिर्डीत पत्रकारांशी बोलतांना मंत्री विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपस्थित होते.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com