NCP Politics: भाजप नेते गणेश गीतेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश रखडला?, नेते म्हणाले, थोडे थांबा!

Ganesh Gite politics: राष्ट्रवादीच्या सामाजिक समीकरणांमुळे भाजपच्या गणेश गीते यांची झाली अडचण?
Kunal Darade, Uday Sangle & Ganesh Gite
Kunal Darade, Uday Sangle & Ganesh GiteSarkarnama
Published on
Updated on

BJP- NCP Politics: विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. यामध्ये नाशिक शहरातही जोरदार हालचाली सुरू आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश गीते हे नाशिक पूर्व मतदार संघातून इच्छुक उमेदवार आहेत. या मतदारसंघात राहुल ढिकले हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

आमदार ढिकले यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा असलेल्या नाशिक पूर्व मतदार संघात माजी आमदार बाळासाहेब सानप आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते हे दोघेही भाजपकडे इच्छुक आहेत. मात्र राजकीय समीकरणे विचारात घेता भाजपाची उमेदवारी आमदार ढिकले यांनाच मिळेल, असे बोलले जाते.

श्री गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी दाखवली आहे. श्री गीते यांनी शुक्रवारी पक्षाशी संपर्क केला. उमेदवारी बाबत चर्चा केली. त्यानंतर ते प्रवेश करण्याच्या तयारीनेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले होते.

Kunal Darade, Uday Sangle & Ganesh Gite
Ajit Pawar politics: अजित पवार यांनी दाखवली भीती, विरोधक योजना बंद करतील!

नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे विचारात घेता, श्री पाटील यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनांमुळे हा प्रवेश स्थगित करण्यात आला. त्यात सिन्नर आणि नाशिक पूर्व यांच्या उमेदवारीत सांगड कशी घालायची ही समस्या आहे.

श्री गीते यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या दुपारी बारापर्यंत याबाबतच निर्णय होईल. त्यात सिन्नरमधून उदय सांगळे यांना प्रवेश द्यावा की, नाशिक पूर्व मतदारसंघातून श्री. गिते यांना ही अडचण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे सिन्नर विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात देखील विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल, असा उमेदवार पक्षाकडे नाही. त्यामुळे उदय सांगळे यांना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्याचे कळते.

Kunal Darade, Uday Sangle & Ganesh Gite
Nirmala Gavit Politics: काँग्रेसच ठरलं; इगतपुरीतून माजी आमदार निर्मला गावित उमेदवार!

याबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा सांगळे यांच्या प्रवेशाला विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगळे यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर खासदार राऊत यांनी आक्षेप घेतल्याचे देखील कळते.

मात्र आता अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने सांगळे यांना प्रवेश देण्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जवळपास निश्चित केल्याचे कळते. आज सायंकाळी या संदर्भात चर्चा आणि निर्णय होईल. रविवारी सांगळे किंवा श्री. गिते यापैकी एकाचा प्रवेश होऊ शकतो.

प्रवेश झाल्यास सांगळे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील. जिल्ह्यातील सामाजिक समीकरणांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या सात जागा आहेत.

येवला मतदार संघात यापूर्वीच कुणाल दराडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. सिन्नरची जागा देखील पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सामाजिक समीकरणांनुसार सांगळे हे त्यात बसतात. त्यामुळे एकाच वेळी ओबीसी समाजाचे किती उमेदवार देणार, ही अडचण आहे.

या अडचणीमुळे भाजप नेते गणेश गीते यांची राजकीय अडचण झाली आहे. त्यांचा प्रवेश अनिश्चित आहे. त्यामुळे नाशिक पूर्व मतदार संघाचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जगदीश गोडसे या प्रेस कामगार नेत्याला उमेदवारी देण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com