Ajit Pawar politics: अजित पवार यांनी दाखवली भीती, विरोधक योजना बंद करतील!

Hiraman Khoskar :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार हिरामण खोसकर यांना उमेदवारी जाहीर केली.
Hiraman Khoskar & Ajit Pawar
Hiraman Khoskar & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: काँग्रेसने क्रॉस वोटिंग केल्याने आमदार हिरामण खोसकर यांना बडतर्फ केले. त्याच आमदार खोसकर यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची उमेदवारी जाहीर केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आज काँग्रेसने क्रॉस वोटिंग साठी बडतर्फ केलेल्या आमदार हिरामण खोसकर यांना थेट उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी आमदार खोसकर यांच्या कामाचे कौतुक केले. खोसकर हे खूप चांगले आमदार आहेत.

आमदार खोसकर यांनी गेली पाच वर्षे जनतेची सेवा केली. त्यामुळे यंदा पुन्हा त्यांना संधी द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. इगतपुरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाने अतिशय वेगाने हालचाली करीत पर्यायी उमेदवार शोधला.

आता निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारने त्याहीपेक्षा अधिक गतीने पावले टाकत थेट प्रचाराची सुरुवात केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे आमदार खोसकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

Hiraman Khoskar & Ajit Pawar
Ahilyanagar : CM एकनाथ शिंदेंना घरचा आहेर, प्रस्थापितांच्या मुद्यावरून माजी खासदारानं डागली तोफ

या सभेला चांगल्या प्रतिसाद मिळाला यावेळी मंत्री छगन भुजबळ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार खोसकर यांचा विविध नेते उपस्थित होते

उपमुख्यमंत्री पवार यांनी या सभेत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा राग आळवला. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न, कुंभमेळा, शेतमालाला भाव, पिक विमा हे सर्व प्रश्न केंद्रातील सरकारच्या मदतीने निश्चितपणे सोडवले जातील. तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या, आम्ही केंद्रातील सरकारकडे जाऊ आणि त्यांच्याकडून निधी आणू. तुमचे प्रश्न सोडवू ,असे त्यांनी यावेळी सांगितले

उपमुख्यमंत्री पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर सांगितले. या योजनेचा खूप गाजावाजा सुरू आहे. अनेक लोक त्यावर खुष आहे. आमदारांना लोक फोन करीत आहेत, असे ते म्हणाले.

Hiraman Khoskar & Ajit Pawar
Jayant Patil Politics: जयंत पाटलांच्या भेटीसाठी माजी मंत्री बबन घोलप यांची चार तास प्रतीक्षा!

या सभेतही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह आम्ही सगळ्यांनी ही योजना यापुढेही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधक म्हणतात लवकरच ही योजना बंद होईल. मात्र लाडकी बहीण योजना सुरूच राहील.

प्रत्येक गोरगरीब महिलेला यापुढेही पैसे मिळत राहतील. कारण आम्ही त्यांचे सख्खे भाऊ आहोत. सावत्र भाऊ नाही. या योजनेबाबत काँग्रेसचे लोक हायकोर्टात गेले. योजना बंद करा, असे म्हटले. मात्र हायकोर्टाने देखील त्यांच्या ऐकलेले नाही.

माता भगिनींनी मतदान करताना महायुतीलाच मतदान करावे. विचारपूर्वक मतदान करावे. म्हणजे ही योजना यापुढेही सुरू राहील. विरोधक सत्तेत आल्यास योजना बंद करतील. त्यामुळे सावध होऊन मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या या सभेत महायुतीच्या प्रचाराचा अजेंडा काय असेल, याची चुणूक दाखवली. त्यांनी वारंवार मतदारांना विरोधक सत्तेत आल्यास आम्ही सुरू केलेल्या योजना बंद करतील, अशी भीती दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

त्यासाठी त्यांनी महिलांचा आवर्जून उल्लेख करीत आपल्या योजना सांगितल्या. एकंदरच आता विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. याचा प्रत्यय इगतपुरी मतदारसंघात आज आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com