Nagar Vikhe Vs Thorat News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऊस उत्पादक गटातून तीनही उमेदवार हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात-विवेक कोल्हे यांच्या पॅनेलचे निवडून आले आहेत, त्यामुळे तो विखे पाटील यांच्यासाठी धक्कादायक निकाल आहे. तीन उमेदवार विजयी झाल्याने थोरात-कोल्हे गटाने आघाडी घेतली आहे. (Ganesh sugar factory Result : Kolhe-Thorat panel's three candidate won from sugarcane producer group)
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sugar Factory Election) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांच्याविरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी एकत्रित पॅनेल उभा केला आहे. त्यात पहिला निकाल विखे पाटील यांच्या बाजूने लागला होता. मात्र, ऊस उत्पादक गटातून तीन उमेदवार विजयी झाल्याने थोरात-कोल्हे यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.
नगर जिल्ह्यातील थोरात विरुद्ध विखे पाटील संघर्ष गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आला आहे. विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोरात आणि विवेक कोल्हे यांचे पॅनेलने विखे पाटील पॅनेलला जोरदार आव्हान दिले होते. ‘ब’ वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके हे १५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा पराभव केला. चोळके यांना ४४ मते पडले असून जाधव यांना २९ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली आहेत.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील मैदानात उतरल्या होत्या. गणेश कारखान्याच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे गटाच्या पॅनलच्या प्रचाराची धुरा संजीवनीच्या कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या खांद्यावर होती. पण शेवटच्या टप्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील प्रचारात उतरल्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत पाहायला मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.