BJP's Mission Baramati : मिशन बारामतीसाठी भाजपचा संग्राम थोपटेंसाठी ‘ट्रॅप’; भोरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत शीतयुद्ध

भोर नगरपालिकेसाठी आणि तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी जास्त वेळ देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे.
Supriya Sule-Sangram Thopte
Supriya Sule-Sangram ThopteSarkarnama
Published on
Updated on

Bhor Congress-NCP NEWS : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांतील भोर तालुक्यात शीतयुध्द सुरु झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही पक्षांत शीतयुद्ध सुरू असताना भाजप मात्र या मतदारसंघातील विजयासाठी आमदार संग्राम थोपटेंवर डोळा ठेवून आहे. (Cold war between Congress-NCP at Bhor)

मागील आठवड्यात भोर (Bhor) तालुक्यातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याच्या एकाच कामाचे दोनदा भूमिपूजन झाले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या निगुडघर-करंजगाव-म्हसर खुर्द ते म्हसर बुद्रूक या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रथम आमदार संग्राम थोपटे (Sangram thopte) यांनी केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनीही त्याच कामाचे पुन्हा भूमिपूजन केले. मात्र दोघांनीही भाषणात एकमेकांबाबत एक शब्दही उच्चारला नाही.

Supriya Sule-Sangram Thopte
Shivsena News: आता साताऱ्याचा आमदार रडारवर.. बदलीसाठी दीड कोटीचा व्यवहार कोण करतंय?; अंधारेंचा निशाणा कोणावर

प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याची मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली असल्याचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते सांगतात, तर आम्ही मागणी करून खासदार सुप्रिया सुळे यांनी शिफारस देऊन व पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला असल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यात दोघांमधील शीतयुध्दाची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या हिर्डोशी (ता.भोर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन व लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. आता आमदार संग्राम थोपटे यांनीही हिर्डोशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्‌घाटन करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भोर तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामधील अंतर्गत वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Supriya Sule-Sangram Thopte
Sahakar Shiromani Result : मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; काळे म्हणतात, ‘हे तर स्टंटबाजीचे....’

सुप्रिया सुळे भोर शहरात घालणार लक्ष

पुढील काही महिन्यांत भोर नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आमदार-खासदारांनी श्रेयवादाची लढाई सुरु केली असल्याचे बोलले जात आहे. भोर नगरपालिकेसाठी आणि तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी जास्त वेळ देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले आहे.

सध्या भोर नगरपालिका ही कॉंग्रेसच्या ताब्यात असून एकही विरोधक नाही. पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यात आले होते. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांचे तालुक्यातील विशेषतः भोर शहरातील मताधिक्य कमी झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नगरपालिकेतील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसही प्रयत्नशील आहे.

Supriya Sule-Sangram Thopte
Sahakar Shiromani Result : विजयानंतर कल्याणराव काळेंचा अभिजीत पाटलांवर हल्लाबोल; ‘विरोधकांची गुर्मी उतरवली...’

भोर विधानसभाही भाजप लढणार

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी हा केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर तालुक्यातील भाजप पदाधिकारीही निधी आमच्यामुळेच मिळाला असल्याचा दावा करीत आहेत. या शिवाय आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीबरोबर लोकसभा व विधानसभेलाही भाजपचा उमेदवार उभा राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

Supriya Sule-Sangram Thopte
Shinde Group Entry in Legislative Council : मनीषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिंदे गटाची होणार विधान परिषदेत एन्ट्री

भाजपचा डोळा संग्राम थोपटेंवर

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यातील काही प्रमुख स्थानिक पदाधिकारी हे भाजपसोबत आहेत. मात्र, भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यातून एकही मोठा स्थानिक पदाधिकारी भाजपसोबत नाही. यामुळे भाजपच्या मिशन बारामती उपक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचा अश्वमेध रोखण्यासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना आपलेसे करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भोर तालुक्याला देण्यात येत असलेला निधी आणि बंद पडलेला राजगड सहकारी साखर कारखाना पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी निधी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com