Raj Thackeray : मुंबईतील एका वकिलाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कथित भाषण आणि हिंदी भाषेवरुन नागरिकांवरील कथित हल्ल्या प्रकरणी एफआयआर दाखल करा अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदी भाषेवरुन द्वेष पसरवत राजकीय फायद्यासाठी समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यांनी याआधीही याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, याप्रकरणी एफआयआर दाखल न झाल्याने त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. हिंदी भाषिकांविरुद्ध हिंसाचार भडकवणे व भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर करत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे.
या याचिकेत 5 जुलैच्या शिवसेना(उबाठा) व मनसेच्या विजयी मेळाव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे यांनी मराठी न बोलणाऱ्यांच्या कानाखाली मारण्याचा सल्ला देत अशा व्यक्तींवर हल्ला करण्याचं समर्थन केल्याचा आरोप याचिकेत आहे. राज ठाकरे यांचे हे वक्तव्य मराठी भाषेवरील प्रेमापोटी नव्हे तर राजकीय हेतुने प्रेरित असून या सगळ्या गोष्टी महापालिका निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी मुद्दाम उचलून धरल्या जात आहेत असं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
राज ठाकरे जाणूनबुजून समाजात तेढ निर्माण करत आहेत. त्यांची वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणारी आहे. हे भारतीय न्याय संहिता च्या कलम 152 अंतर्गत शिक्षेस पात्र आहे. असं या याचिकेत म्हटलं आहे. तसेच राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या किंवा मॉब लिंचिंगच्या घटना घडू नयेत याची खबरदारी घ्यावी व त्या रोखण्यासाठी पोलिसांना कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून उपाध्याय यांनी केली आहे.
तसेच या याचिकेत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडेही मागणी करण्यात आली आहे. देशातील अशा राजकीय पक्षांच्या बेकायदेशीर आणि देशाच्या एकात्मतेस धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त धोरण तयार करावं, आणि जर असे पक्ष दोषी आढळले, तर त्यांचं मान्यताही मागे घ्यावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.