Ghatkopar Incident Politics : घाटकोपर दुर्घटनेपासून राजकारणी धडा घेतील का? सत्यजित तांबे

Ghatkopar Hoarding Accident : मुंबई पुण्यात अशा दुर्घटना होऊनही प्रशासनाने याबाबत ठोस धोरण ठरविलेले नाही. आता याबाबत प्रशासनाने होर्डिंगला परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली होती का? असा प्रश्न पुढे आला आहे. त्यातून पुन्हा महापालिका आणि राज्य शासनावर टीका होत आहे.
Ghatkopar hoarding accident
Ghatkopar hoarding accidentSarkarnama

Satyajeet Tambe News: सोमवारी वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळले. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर गंभीर विचार करण्याची गरज आहे. या दुर्घटनेपासून धडा घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत.

पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथे काल एक मोठे होर्डिंग कोसळले. या अपघातात 74 जण जखमी झाले. 14 जण ठार झाले. त्यामुळे या घटनेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह (Eknath Shinde) विविध नेत्यांनी येथे भेट दिली अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली. आता याबाबत प्रशासनाने होर्डिंगला परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली होती का? असा प्रश्न पुढे आला आहे. त्यातून पुन्हा महापालिका आणि राज्य शासनावर टीका होत आहे.

Ghatkopar hoarding accident
Mumbai Hoaring Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, 74 जणांना वाचवण्यात यश

यासंदर्भात आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी फेसबुक वर पोस्ट केली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पाच वर्षांपूर्वी देखील पुणे शहरात अशी दुर्घटना घडून दोघांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही पुणे शहरातच अशी घटना होऊन पाच जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटना घडूनही त्याच जागेवर पुन्हा नवे होर्डिंग लागले आहे. शहराच्या अन्य भागातही असेच मोठे मोठे होर्डिंग लागलेले असतात. त्याबाबत पुरेशी दक्षता प्रशासकीय स्तरावर घेतलेली आहे का? असा प्रश्न आणि भीती दोन्हीही निर्माण होते.

आमदार तांबे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात यातील बहुतांशी होर्डिंगची मालकी राजकीय लोक किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेच आहे. कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारा हा व्यवसाय पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये खूप तेजीत आहे. तेथे जाहिरातीचे दरही तेजीत असल्याने या माध्यमातून लाखोंची उलाढाल होत असते.

मुंबई शहरात याबाबतचे स्पष्ट धोरण आहे. मात्र त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केलेली दिसत नाही. पुणे शहरात मात्र दोन दुर्घटना घडलेल्या आहेत. तरी देखील याबाबतचे स्पष्ट धोरण महापालिकेने तयार केलेले नाही.

त्यामुळे घाटकोपरच्या घटनेवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात काल प्रत्यक्ष घटनास्थळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना नागरिकांनी अडवून चांगलेच झापले होते. आता पुढे या अपघातात जीव गमावलेल्यांना आणि जखमी नागरिकांना काय मदत मिळते याची उत्सुकता आहे.

Ghatkopar hoarding accident
Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील कमी टक्क्याने कोणाची दांडी होणार गुल ? राज्यातील दिग्गज नेत्यांची लागणार कसोटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com