Girish Mahajan News : पत्रकार बूम घेऊन मागे मागे, मंत्री गिरीश महाजन पुढे पुढे... कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर बोलती बंद?

Girish Mahajan Audio Clip Controversy : मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे माजी पदाधिकारी विजय चौधरी यांच्यातील कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणावर पत्रकारांनी महाजनांना सवाल केला. परंतु महाजनांनी त्यावर सविस्तर भाष्य करणं टाळलं.
Girish Mahajan News
Girish Mahajan News
Published on
Updated on

Girish Mahajan Audio Clip Controversy : मंत्री गिरीश महाजन आणि नंदुरबारचे भाजप पदाधिकारी विजय चौधरी यांच्यातील कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपची राज्यभर चर्चा आहे. महाजन जळगावात आले असता पत्रकारांनी त्यांना ऑडियो क्लिपबाबत विचारणा केली असता त्यावर मंत्री महाजन यांनी देलेल्या रिॲक्शनची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

त्याचे झाले असे की, जळगाव शहराजवळ पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचा भराव पावसामुळे खचला आहे. खचलेल्या उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी चौधरी यांच्यासोबत बोलताना व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर थेट प्रश्न विचारला.

मात्र, महाजन यांनी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळलं. यावेळी पत्रकार हातात बूम घेऊन प्रश्न विचारत त्यांच्या मागे मागे पळत होते. पण महाजन यांनी थेट पुढे चालत जात त्यावर अधिक बोलणं टाळलं. परिणामी महाजन पुढे पुढे आणि पत्रकार मागे मागे असे चित्र पाहायला मिळाले.

Girish Mahajan News
Girish Mahajan : घराबाहेर न पडणाऱ्यांची पंतप्रधान मोदींशी तुलना कशी? गिरीश महाजनांचा ठाकरेंच्या फायरब्रॅण्ड नेत्यावर पलटवार

भाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना कथित ऑडिओ क्लिप प्रकरण चांगलच भोवलं. त्यांच्या अनेक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. ज्यात त्यांनी भाजपच्या काही महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. यातील एका क्लीपमध्ये चौधरी मंत्री महाजन यांच्यासोबत बोलत असल्याचा आरोप झाला. मात्र, चौधरी यांनी व्हायरल क्लीप फेक असून एआय द्वारे बनवण्यात आल्याचा दावा केला. मात्र, या प्रकरणामुळे चौधरी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

Girish Mahajan News
Girish Mahajan : नाशिकच्या खड्ड्यांवरुन भुजबळांची फायरिंग; गिरीश महाजन म्हणतात भुजबळ साहेब म्हणतात ते बरोबर, यंत्रणेला 8 दिवसांचा अल्टिमेटम

याच कथित ऑडिओ क्लीप प्रकरणावरुन पत्रकारांनी जळगाव दौऱ्यावर आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न केला. विशेषतः भाजपच्याच माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तसेच आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी झालेल्या कथित आक्षेपार्ह चर्चेवर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाजन यांनी कोणत्याही प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं ते पुढे निघून गेले.

पत्रकारांनी मागे मागे धावत वारंवार प्रश्नांचा मारा सुरू ठेवला मात्र महाजन पुढे पुढे जात राहीले. त्यांनी केवळ पक्षाने विजय चौधरी यांच्यावर कारवाई केली आहे, त्यांनी राजीनामा दिला एवढेच काय ते स्पष्ट केले. या प्रश्नावर त्यांनी जाणीवपूर्वक अधिक बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं प्रकरण काय?

विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. त्यांच्या अनेक कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या. पहिल्या क्लिपमध्ये पक्षाच्याच माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहण गावित यांच्या तक्रारीवरुन चौधरी यांच्याविरोधात जातिवाचक शिविगाळ व अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील कथित संभाषणाची आणखी एक ऑडिओ क्लीप समोर आल्याने हा वाद अधिकच वाढला. कारण या कथित क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, त्यांचे सासरे आमदार एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याविषयीही चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला. त्यावर खडसे कुटुंबियांनी देखील त्याचा निषेध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com