फक्त मी, मी म्हणणाऱ्या एकनाथ खडसे यांना स्वत:ची ग्रामपंचायत निवडून आणता येऊ शकली नाही. त्या एकनाथ खडसे यांनी जामनेर तालुक्यातील विकासाबाबत बोलू नये. मला पराभूत करायचे असेल, तर इथे मुक्कामी राहून पाडून दाखवा, असं आव्हान गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिलं आहे. महाजन यांचं 'चॅलेंज' खडसे स्वीकारतात का? आणि काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
गिरीश महाजन ( Girish Mahajan ) हे जामनेर मतदारसंघातील एका मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी महाजन यांनी खडसेंचा पक्षप्रवेश, 'सीडी' प्रकरण आणि विविध विषयांवरून एकेरी उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला आहे.
"खडसे म्हणतात, जामनेरमध्ये येत राहणार आणि भाषण करणार.. अरे बाबा जामनेरला मुक्कामीच राहा. दूध संघ आणि जिल्हा बँक माझ्यामुळे निवडून आली, असंही खडसे बोलतात. मात्र, हे सगळं पक्षामुळे मिळालं आहे. आम्हीही मदत केली. पण, तिथेही सगळं माझ्यामुळेच मिळालं, असं खडसे ( Eknath Khadse ) दाखवितात," अशी टीका महाजन यांनी केली.
"एवढ्या मोठ्या नेत्याची वाईट अवस्था झाली आहे. परंतु, जामनेरमधील लोक तुम्हाला दाद देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आपलं वय काय, आपण रोज काय करतोय... रोज अश्लील बोलायचं.. आपली लायकी काय राहिली आहे," असा हल्लाबोलही महाजन यांनी खडसे यांच्यावर केला आहे.
"दिल्लात प्रवेश झाल्याचं खडसे सांगतात... पण, प्रवेशाचे फोटो खडसेंना भेटत नाहीत. असा प्रवेश होतो का?" असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.
"माझ्याकडे सीडी असल्याचंही खडसे बोलतात. पण, खडसेंकडे सीडी होती का? मोबाईलमध्ये व्हिडिओ होता, तर गायब कसा झाला?" असा प्रश्नही महाजन यांनी विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.