Girish Mahajan : खडसेंचा विषय निघताच भाजपचे संकट मोचक गडबडले, तडक निघूनच गेले!

Girish Mahajan vs Eknath Khadse : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांनी आपली संकटमोचक अशी प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. पत्रकार अथवा सामान्यांच्या कोणत्याही प्रश्नाला ते सोयीने आणि मोठ्या कृपेने उत्तरे देत असतात. त्यामुळे त्यांचे दौरे नेहमीच बातम्या देऊन जातात.
Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 20 Jun : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांनी आपली संकटमोचक अशी प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. पत्रकार अथवा सामान्यांच्या कोणत्याही प्रश्नाला ते सोयीने आणि मोठ्या कृपेने उत्तरे देत असतात. त्यामुळे त्यांचे दौरे नेहमीच बातम्या देऊन जातात.

गुरुवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी गोदावरीला आलेला पूर आणि पावसाची परिस्थिती याचा आढावा घेतला. वाहतूक कोंडीबाबत द्वारका परिसराची पाहणी देखील केली.

यावेळी गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यापासून तर राज्याच्या अनेक प्रश्नांना आपल्या स्टाईलने झटपट उत्तरे दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपवर केलेली टीका याबाबत आठवण करून दिली. तेव्हा आपल्या स्वभावाप्रमाणे लगेचच त्यांनी उत्तर देण्यासाठी सुरुवातही केली. आता त्याचे आत्मपरीक्षण त्यांनीच... एवढे बोलल्यावर मात्र ते चपापले.

Eknath Khadse, Girish Mahajan
Yashwant Verma currency case : नोटा सापडलेल्या खोलीत न्यायमूर्ती वर्मा यांच्या कुटुंबियांचा मोठा वावर; समितीच्या चौकशीत गैरवर्तन सिद्ध

माजी मंत्री खडसे यांचा प्रश्न अवघड वाटू लागल्याने त्यांनी लगेचच बोलणे थांबवले. क्षणाचाही विलंब न करता ते तडक निघून गेले. त्यामुळे पत्रकारांचा चांगलाच हिरमोड झाला. खडसे आणि महाजन यांच्या वादाची एक बातमी हुकली, अशी भावना पत्रकारांमध्ये होती.

लोकसभा निवडणुकीत रावेरच्या खासदार आणि सध्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता होती. त्या माजी मंत्री खडसे यांच्या स्नुषा असल्याने गिरीश महाजन यांनी त्यांच्या उमेदवारीत अडथळे आणल्याचे चित्र होते. त्यावरून खडसे कुटुंबात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री खडसे यांनी आपल्या संपर्कातील दिल्लीतील भाजप नेत्यांची संधान बांधले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मिळणारी संभाव्य उमेदवारी नाकारली. त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला होता. लोकसभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना भाजपच्या रक्षा खडसे यांचा प्रचार केला होता.

Eknath Khadse, Girish Mahajan
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार एकाच समितीत, नेमकं काय काम करणार ?

नंतर मात्र त्यात माशी शिंकली. त्याला गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांचा विरोध असल्याचा दावा खडसे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर वादग्रस्त आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित असल्याचा व 27 गुन्हे दाखल असलेल्या सुधाकर बडगुजर यांना मंत्री महाजन यांनी वाजत गाजत भाजप पक्षात प्रवेश दिला.

याच पार्श्वभूमीवर बडगुजर चालतात तर मी का नको असे विधान खडसे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना मंत्री महाजन यांची अडचण झाली. जळगाव आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणात गेले दशकभर माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील पक्ष अंतर्गत राजकीय वाद सर्वश्रुत आहे. यामध्ये आगीत तेल पुतण्याचे काम बऱ्याच प्रमाणात मंत्री महाजन यांनी देखील केले, असा आरोप केला जातो. त्याला जळगावच्या स्थानिक राजकारणाचा संदर्भ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com