Girish Mahajan : पूर्वी जे झालं ते झालं, आता भ्रष्टाचार होऊ देणार नाही; मंत्री महाजन नेमकं कशाबद्दल बोलले?

Jalgaon Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधरण सभेत गिरीश महाजन यांनी दूध उत्पादकांना ५० पैसे भाव फरक जाहीर केला.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करुन द्यायचे आहे. या पूर्वी जे झाले ते झाले, पण आता दूध उत्पादक संघात भ्रष्टाचार होऊ देणार नाही. संघ हा शेतकऱ्यांचा असून त्यांच्या हितासाठी असल्याचे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सन २०२४ -२५ या वर्षाची ५४ वी वार्षिक सर्वसाधरण सभा शनिवारी ( ता. २७) एका हॉटेलात पार पडली. संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी गिरीश महाजन बोलताना म्हणाले, यंदा दोन कोटी २७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. पण यावर समाधान मानून चालणार नाही. पुढील दोन वर्षांत हा नफा तिप्पट, चौपट करणे आवश्यक असल्याचे महाजन म्हणाले.

महाजन पुढे म्हणाले की, दूध उत्पादक संघ नफ्यात यायला हवा व त्यासाठी पुढच्या काळात तंत्रज्ञान, विपणन आणि संकलन या क्षेत्रात आवश्यक तो बदल करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काम केले जाईल. त्यासाठी ५० कोटींचा निधी उभारण्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्नशील असल्याचे महाजन म्हणाले.

Girish Mahajan
Chhagan Bhujbal : पावसाने मोठे नुकसान, मुंबई दौरा रद्द करत भुजबळांची येवल्याकडे धाव

दरम्यान यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५० पैसे भाव फरक जाहीर करण्यात आला. स्वत:मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला नवीन पशुखाद्य कारखाना जिल्हात लवकरच उभारण्यात येईल असेही महाजन यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त दूध संघाकडे संकलनासाठी द्यावे, जेणेकरून पुढील वर्षांत नफा आणखी वाढेल, असेही यावेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसांत दुधाचे दर वाढवले जाणार आहेत. यामुळे उत्पादकांना फायदा होईल असं आमदार मंगेश चव्हाण यावेळी म्हणाले.

Girish Mahajan
Raj Thackeray Leader : राज ठाकरेंच्या ढाण्या वाघाने भाजपला तडातडा तोडलं, सगळे बघतच राहिले

यावेळी सभेला अध्यक्ष मंगेश चव्हाण, वस्त्रोद्योजक मंत्री संजय सावकारे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संदीप पवार, संचालक अनिल देशमुख, संचालक रोहित निकम, भरत मोरे, मुख्य व्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com