Dada Bhuse Politics : भाजपच्या संकटमोचकांवर शिवसेनेचे 'दादा' ठरले वरचढ, कुंभमेळा नगरीतूनच केलं हद्दपार..

Trimbakeshwar Municipal Election : दादा भुसे यांनी कुंभनगरी त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यामंत्र्यांच्या पक्षाला पराभूत करीत शिवसेनेचा भगवा भडकवला आहे. महाजन यांना हा निकाल धक्का देणारा ठरला.
Girish Mahajan | Dada Bhuse
Girish Mahajan | Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : कुंभनगरी अर्थात त्र्यंबकेश्वर हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेल्या निवडणुकीत चौदा नगरसेवकांसह नगराध्यक्षही भाजपचा होता. पण यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत संकटमोचक गिरीश महाजन यांच्या हातून हा गड निसटला. त्र्यंबकचा निकाल मंत्री महाजनांसाठी धक्कादायक ठरला.

भाजपकडून मंत्री गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दादा भुसे यांनी प्रचार काळात त्र्यंबकमध्ये जात आपल्या हाताने रणनिती आखली होती. दुसरीकडे आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन स्वत:कुंभमेळामंत्री गिरीस महाजन देखील या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

पंरतु दादा भुसे यांनी कुंभमेळा मंत्र्यांना धूळ चारत शिवसेनेचा भगवा त्र्यंबकमध्ये भडकवला. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले कैलास घुले यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष झाल्या. कुंभनगरीत झालेल्या या पराभवाने महाजन यांना मोठा हादरा बसला.

Girish Mahajan | Dada Bhuse
Trimbakeshwar Nagarparishad : त्र्यंबकमध्ये मंत्री गिरीश महाजनांना धक्का, कैलास घुलेंचा पराभव, शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी

भाजपला यंदाच्या निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. गेल्या निवडणुकीत १४ नगरसेवक असलेल्या भाजपला केवळ ६ नगरसेवक यंदा निवडून आणता आले. नगराध्यक्षपदाचा उमेदवारही पराभूत झाला.

साहजिकच गिरीश महाजन आणि दादा भुसे या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची होती. ज्यात दादा भुसे हे महाजनांना वरचढ ठरले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश गंगापुत्र यांनी अगदी मध्यावर लढतीत सामील न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद शिवेसेना शिंदे गटाच्या त्रिवेणी तुंगार यांच्या पाठीशी उभी राहिली.

Girish Mahajan | Dada Bhuse
Raksha Khadse : बालेकिल्ल्यातच मंत्री रक्षा खडसेंचं राजकीय वजन घटलं, पराभवाने बसला मोठा हादरा..

भाजप व शिवसेना शिंदे गट अशी लढत असल्याने भाजप विरोधी पक्षांनी शिंदे गटाला मदत केली. त्यात शिवसेना (ठाकरे गट) व मनसेचे बहुतांश कार्यकर्ते शिंदे गटा सोबत दिसले. साहजिकच भाजप विरुद्ध सर्वपक्ष असे एकंदरीत वातवरण शहरात निर्माण झाले. त्यातून भाजपचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com