Simhasth Kumbh Mela Politics; चौकशी पथक धडकताच नाशिक महापालिकेचे अधिकारी सैरभैर, रस्त्यांचे अंदाजपत्रक भोवणार?

Girish Mahajan doubts, Municipal Corporation, Kumbh Mela road estimate doubled, investigation team arrives at NMC office-रस्त्यांचा घोटाळा; पहिल्या दिवशी गिरीश महाजन यांचे चौकशीचे आदेश, दुसऱ्या दिवशी चौकशी पथक नाशिक महापालिकेत धडकले!
Nashik Roads pathholes
Nashik Roads pathholesSarkarnama
Published on
Updated on

NMC Road News: नाशिक महापालिका प्रशासन पुन्हा एकदा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या कामात घोटाळा असल्याचा संशय आहे. त्याचा चौकशीला सुरुवात झाली आहे.

नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १८८ किलोमीटर लांबीचे रस्ते करण्याचे काम हाती घेतले आहेत. या रस्त्यांच्या अंदाजपत्रकात कृत्रिमरीत्या दर वाढविण्यात याचा संशय सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता.

सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते. महापालिका शहर अभियंता याबाबत माहिती दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनातील सर्व रस्त्यांच्या खर्चाची तपासणी होणार आहे. यामुळे महापालिका बांधकाम अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Nashik Roads pathholes
Bacchu Kadu Politics: बच्चू कडू यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप, दिला 'हा' इशारा...

दोन दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले. या पाठोपाठ लगेचच मंत्रालयातील पंचवीस अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. अचानक चौकशी पथक दाखल झाल्याने बांधकाम विभागाचे अधिकारी सैरभैर झाले. चौकशी करणाऱ्यांना काय उत्तरे द्यावीत हा गंभीर पेच त्यांच्यापुढे आहे.

Nashik Roads pathholes
Rohit Pawar On Chhagan Bhujbal : फडणवीसांची प्रशंसा करणाऱ्या भुजबळांच्या कच्च्या अभ्यासाची पवारांकडून चिरफाड; अंतरवाली सराटीमधील लाठीचार्ज गृहमंत्रालयाच्या आदेशानेच

चौकशी पथक शुक्रवारी महापालिकेत आल्यावर त्यांना कुंभमेळ्याच्या रस्त्यांच्या अंदाजपत्रकांच्या फाइल्स हव्या होत्या. मात्र महापालिकेचे कोणीही अधिकारी त्यांना भेटण्यास पुढे आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत असल्याचा बहाना केला. महापालिका आयुक्त देखील बैठकीत शव्यस्त असल्याचे पथकाला सांगण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा आराखडा केला आहे. त्यात दोन हजार २९१ कोटिंगच्या रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात १८८ किलोमीटर रस्ते ४६८ कोटी रुपये खर्चात झाले होते. आता त्यात मोठी वाढ झाली आहे. अंदाजपत्रकात एवढी वाढ कशी झाली, याविषयी संशय व्यक्त होत आहे.

आता थेट मंत्र्यांनीच आदेश दिले आहेत. २५ सदस्यांचे चौकशी पथक महापालिकेत दाखल झाले आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याचे रस्ते आणि विकास कामे वादात सापडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकारी सैरभैर झाल्याचे चित्र आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com