Eknath Khadse : संकटमोचक आता कुठे गेले? महाजनांनी मैत्रीचा हात झटकला आता खडसे पुन्हा लागले मागे

Eknath Khadse On Girish Mahajan : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांना घेरलं आहे. संकटमोचक कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे.
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.

मात्र, हेच वैर विसरुन खडसेंनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाजनांना निमंत्रण देत मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महाजनांनी तो झटकला अन् दोघांमधील वादाची खटकी आणखीच पॅक झाली. आता खडसेंनी पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या महाजनांना मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेरलं आहे.

गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हटले जाते. पंरतु, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू असताना, मंत्री महाजन आता कुठे गेले आहेत, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थितीत केला आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेनंतर माजी मंत्री खडसे यांनी मंत्री महाजन यांच्यावर जळगावत माध्यमांशी बोलताना जोरदार निशाणा साधला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यामुळे पुन्हा ऐरणीवर आला असताना अशात, सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका काय आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्या ‘संकटमोचक’ या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Girish Mahajan & Eknath Khadse
Eknath Khadse: शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये खडसेंना मंत्रीपदं देण्यावरुन झाला होता ड्रामा; प्रमोद महाजनांनी असा फिरवला गेम

मंत्री गिरीश महाजन हे संकटमोचक या नात्याने राज्यातील विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांमध्ये मध्यस्थी करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितीत त्यांनी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा चिघळत असताना, मंत्री महाजन यांची भूमिका काय? मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यावर सरकारसमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी संवादाची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा असताना ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाजनांचा नेमका सहभाग कुठे आहे, असा प्रश्न खडसेंनी उपस्थितीत केला.

Girish Mahajan & Eknath Khadse
Eknath Khadse Birthday : 40 वर्षे भाजपमध्ये घालवली, अमृतमहोत्सवाला काही नेते आले नाहीत; खडसेंना दु:ख... बोलताना झाले भावूक

आरक्षणाच्या मागणीवरून यापूर्वीही राज्यात मोठे आंदोलन झाले असून, आता जरांगे यांनी पुन्हा मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी एकट्याने मुंबईला धडकण्याची घोषणा केली आहे. मुंबईला आपण एकटेच जाणार असून कुणीही माझ्यासोबत येऊ नका, असं आवाहन जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान अशात खडसे यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा महाजन विरुद्ध खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com