Eknath Khadse: शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये खडसेंना मंत्रीपदं देण्यावरुन झाला होता ड्रामा; प्रमोद महाजनांनी असा फिरवला गेम

Eknath Khadse: शिवसेना-भाजपचं सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा आलं, तेव्हा संभाव्य मंत्र्यांच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे याचं नाव नव्हतं.
Pramod Mahajan_Eknath Khadse
Pramod Mahajan_Eknath Khadse
Published on
Updated on

Eknath Khadse: शिवसेना-भाजपचं सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा आलं, तेव्हा संभाव्य मंत्र्यांच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे याचं नाव नव्हतं. पण नंतर खडसे मंत्री बनले. याबाबत राजकीय ड्रामाही झाला होता, हा किस्सा खुद्द एकनाथ खडसे यांनी सांगितला आहे. पण त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? भाजपच्या नेत्यांची काय भावना होती, हे खडसेंनी कथन केलं आहे.

शिवसेना-भाजपचं सरकार १९९५ मध्ये पहिल्यांदा आलं, तेव्हा संभाव्य मंत्र्यांच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे याचं नाव नव्हतं. पण नंतर खडसे मंत्री बनले. याबाबत राजकीय ड्रामाही झाला होता, हा किस्सा सांगताना एकनाथ खडसे म्हणाले, १९९५ पर्यंतच्या कालखंडात महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून एकनाथ खडसे काम करत होते. त्यामुळं जर आपलं सरकार आलं तर आपल्याला नक्कीच मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी खडसेंना आशा होती.

पण त्यांना मंत्रीपद मिळू शकलं नाही, कारण १९९५ मध्ये जेव्हा शपथविधीचा कार्यक्रम जाहीर झाला परवाच शपथविधी आहे हे समजल्यावर मला प्रमोद महाजनांनी असं सांगितलं की, तुम्हाला मंत्रीमंडळात घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सांगण्यात आलं की, तुम्हाला मंत्रीमंडळात घेता येणार नाही. पण यामध्ये मंत्रीमंडळात घेणार आहेत याचा आनंद होता आणि घेणार नाहीत म्हटल्यावर त्याच दुःखही होतं. पण त्यामध्ये जो पक्ष निर्णय घेईल तो घेईल असं माझी भूमिका होती. 'मित्र म्हणे' या पॉडकास्टच्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

Pramod Mahajan_Eknath Khadse
Pune Liquor Ban: हायकोर्टानं खडसावल्यानंतर पुणे जिल्ह्यातील १२ दिवसांची दारुबंदी मागे; आता फक्त 'या' दिवशीच...; कोर्टात नेमकं काय घडलं?

पण पहिले तीन महिने मी मंत्रीमंडळात नव्हतो, त्यावेळी प्रमोद महाजनांना मला हे विचारताही येत नव्हतं की मला का घेतलं नाही? कारण पहिल्यांदाच आपलं सरकार आलं याचा आनंद होता. त्यामुळं तीन महिन्यानंतर जेव्हा मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर परत मला प्रमोद महाजनांनी सांगितलं की, आता या मंत्रीमंडळात तुला आम्ही घेणार आहोत. त्यावर मी त्यांना म्हटलं की, नक्की घेणार आहात का ते सांगा.

Pramod Mahajan_Eknath Khadse
Eknath Shinde Politics : रवींद्र चव्हाण, कपिल पाटलांच्या विरोधात एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी; बविआ, कथोरें भक्कम साथ!

त्यावर महाजन म्हणाले, तू भाग्यवान आहेस, कारण तुला मंत्रीमंडळात घेतलं का नाही? याचं कारण तू कधी विचारलंच नाहीस. कारण मंत्रीमंडळाची पहिली रचना झाली तेव्हा तुला मंत्रीमंडळात घ्यावं असं ठरलं ती राज्यमंत्री म्हणून ठरलं. पण माझी इच्छा होती की तू राज्यमंत्री म्हणून नव्हे तर कॅबिनेट मंत्री म्हणून यावं. तू जर राज्यमंत्री म्हणून आला असता तर राज्यमंत्रीच राहिला असता, पुढे कॅबिनेट मंत्री होणं अवघड असतं. पण आता मी कॅबिनेट मंत्रीपदासाठी तुझा प्रस्ताव पाठवतोय, शिफारस पाठवतो. त्यानंतर मला महाजनांनी घेतलेला निर्णय योग्य होता. कारण नाहीतर मी राज्यमंत्रीच राहिलो असतो पण आता मंत्री झालो आहे, अशा शब्दांत खडसेंनी तो किस्सा कथन केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com