Shivsena News: दादा भुसेंच्या मतदारसंघात परिवर्तन होईल?

Dada Bhuse: उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव येथील सभा लक्षवेधी ठरण्यासाठी कार्यकर्ते सक्रीय झाले.
Dada Bhuse & Adway Hire
Dada Bhuse & Adway HireSarkarnama
Published on
Updated on

Malegaon News: आगामी काळात शिवसेना (shivsena) -उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हा पक्ष उत्तर महाराष्ट्रात क्रमांक एकवर असेल. तालुक्याच्या (Malegaon) राजकारणातही परिवर्तन होईल तसेच २६ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची होणारी सभा ही लक्षवेधी ठरेल असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अद्वय हिरे (Adway Hiray) यांनी येथे केले. (Shivsena starts prepration for Uddhav Thackeray public rally of Malegaon)

Dada Bhuse & Adway Hire
Vasant More News: मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, पुण्यात एकच खळबळ

उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांच्या श्रद्धेचा आदर करून जेजुरीच्या धर्तीवर श्री क्षेत्र चंदनपुरी देवस्थानाचा विकास करु, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या येथील प्रचार सभेसाठी जनजागृती व प्रचार मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी हिरे यांनी सांगितले.

श्री. ठाकरे यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा २६ मार्चला येथील मसगा महाविद्यालयाच्या क्रीडागणांवर होणार आहे. या सभेच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे जल्लोषात झाला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला.

Dada Bhuse & Adway Hire
Shivsena News: शिवगर्जनेत उपराजधानीकडे ठाकरेंचे दुर्लक्ष, पण ‘शिवधनुष्य’ साठी शिंदे येणार !

श्री. हिरे यांनी शिवसेना भवनात शिवबंधन बांधले. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी मालेगावला सभा घेऊन उत्तर महाराष्ट्रातील रणशिंग फुंकण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार ही सभा होत आहे.

कुलदैवत श्री खंडोबा महाराज, म्हाळसाई, बाणाई माता यांना पुष्पहार अर्पण करून, तळी भरून, भंडाऱ्याची उधळण करत प्रचार यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीने श्री. हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर एकलव्य यांच्या पुतळ्यास व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. भंडाऱ्याची उधळण करत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहण्याची शपथ घेतली.

Dada Bhuse & Adway Hire
MNS News : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाची चर्चा; मनसे नेत्याचं खोचक टि्वट; म्हणाले,'' भावी पंतप्रधानांना...!''

यावेळी प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, लकी खैरनार, मनोज जगताप, नथु जगताप, पवन ठाकरे, विलास बिरारी, संजय भुसे, विकी खैरनार, सनी जगताप, प्रवीण देसले, शेखर पगार, गणेश पाटील, सूर्यकांत पाटील, गणेश पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com