Hiraman Khoskar Politics: बडतर्फ आमदार हिरामण खोसकर यांच्या आरोपाने उडाली खळबळ, म्हणाले...

Hiraman Khoskar Statements: विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याने काँग्रेस पक्षाने बडतर्फ केलेले आमदार हिरामण खोसकर यांनी पक्ष नेत्यांवर आरोप केले.
Hiraman Khoskar & Nana Patole
Hiraman Khoskar & Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Khoskar Vs Patole: क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना पक्षाने निलंबित केले आहे. याच आमदार खोसकर यांनी केलेल्या आरोपाने आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे. गेले तीन महिने याबाबत विविध स्तरावर त्याची चर्चा सुरू होती.

आता या प्रकरणाला आमदार खोसकर यांनी वेगळे वळण दिले आहे. आपण आदिवासी आमदार आहोत. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाणीवपूर्वक आपला छळ केला. गेल्या अडीच महिने याबाबत विविध प्रकारे त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आपल्याला उमेदवारी देण्यास तयार होते, असा दावा देखील आमदार खोसकर यांनी केला. ते म्हणाले, मी सातत्याने प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

Hiraman Khoskar & Nana Patole
Eknath Shinde politics: मुख्यमंत्र्यांची शिवसेना नाशिकमध्ये दोन जागांवरच थांबणार?

नाना पटोले त्यांच्या भेटीसाठी भंडारा येथे देखील गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला उमेदवारी दिली जाईल, असा शब्द दिला होता. मात्र नंतर मला पक्षातून निलंबित केले गेले. अडीच महिने विविध प्रकारे मला त्रास दिला जात होता.

ज्या दिवशी आमदार सुलभा खोडके यांच्यावर कारवाई झाली. तेव्हा माझ्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. नंतर कारवाई झाली यामागे काय हेतू असू शकतो, असा प्रश्न त्यांनी केला. .

यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली होती. क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेल्या आमदारांना उमेदवारी देण्यात येणार नव्हती.. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Hiraman Khoskar & Nana Patole
Thorat Vs Vikhe : पारंपारिक राजकीय हाडवैर कायम, उमेदवारीच्या घोषणेआधीच थोरात-विखेंच्या मुलांमध्ये जुंपली

आमदार खोसकर यांनी आता आपल्या निलंबनाच्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना महायुती अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

या स्थितीत आमदार खोसकर महाविकास आघाडीवर आरोप करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सज्ज झाले आहे. त्यांचा नवीन राजकीय आडाखा असावा. ज्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली ते पक्षाच्या रडारवर होते. त्यांना उमेदवारी देण्यात येणार नव्हती. हा निर्णय थेट दिल्लीतील नेत्यांनी घेतला आहे.

याबाबत चौकशी करून अहवाल देखील सादर करण्यात आला होता. त्यानंतर आमदार खोसकर बच्चावात्मक स्थितीत होते. त्यांनी महायुतीच्या विविध नेत्यांना भेटून उमेदवारीसाठी प्रयत्न केल्याचेही बोलले जाते.

आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात दाखल झाले आहेत. अशा स्थितीत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना अडचणीत आणून मतदारसंघाचा अनुभूती मिळविण्याचा डाव तर टाकलं नाही ना? अशीही चर्चा आहे.

महाविकास आघाडीकडे या मतदारसंघात 18 इच्छुक उमेदवार आहेत. यातील किती उमेदवार सक्षम आणि प्रभावी आहेत, याचा दावा मात्र पक्षाच्या नेत्यांनी केलेलं नाही. काँग्रेसच्या माजी आमदार आणि सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात असलेल्या निर्मला गावित यांचा काँग्रेस प्रवेश होण्याची शक्यता आहे. माजी आमदार गावित या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार खोसकर यांना माजी आमदार निर्मला गावित आव्हान देण्याची शक्यता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com