Girish Mahajan News: नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील इच्छुक नेते अस्वस्थ आहेत. या संदर्भात येत्या एक-दोन दिवसात तोडगा निघेल, असे संकेत आहेत.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा गंभीर वळणावर आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असताना याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. यातून निश्चितपणे ठोस निर्णय घेण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पालकमंत्री नियुक्ती बाबत मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत एक दोन दिवसात निर्णय घेतील. देवाभाऊंची अर्थात मुख्यमंत्री फडणवीस यांची कृपा झाली तर मी पालकमंत्री होऊ शकेल असे सूचक विधान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
नाशिकला २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या तयारीचे अनेक विषय प्रलंबित आहे. पालकमंत्री पद नियुक्ती लांबल्याने त्यावर परिणाम होत असल्याची सध्याची स्थिती आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय लवकर घेणे अपेक्षित आहे. हा निर्णय प्रदीर्घ लांबला आहे. ही वस्तुस्थिती आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे तिघेही पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत.
कृषिमंत्री कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने सदनिका बनावट कागदपत्र प्रकरणी दोषी ठरविले आहे. त्यांना दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व आणि मंत्रीपद दोन्हीही अस्थिर आहे. त्यामुळे कोकाटे स्पर्धेतून बाहेर पडले.
कृषिमंत्री कोकाटे पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचा फायदा भाजपचे महाजन यांना होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत येथे एक दोन दिवसात महाजन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.