
Ahilyanagar News : गुंडगिरीपध्दतीने पोलिस आणि महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरिकांच्या मालमत्ता जमिनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्ह्याचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करताना खासदार नीलेश लंके यांनी संताप व्यक्त केला.
खासदार नीलेश लंकेंनी आज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेतली. त्यांनतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात अतिक्रमण मोहिमेतून सत्ताधाऱ्यांच्या गुंडगिरीवर निशाणा साधला.
गुंडगिरीपध्दतीने, पोलिस (Police), महसूल प्रशासनाचा वापर करून कोणतीही नोटीस न देता सकाळी सात वाजता बुऱ्हाणनगर येथील अभिषेक भगत यांचे मंगल कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर खासदार लंके यांनी ही कारवाई राजकीय आकसातून झाली असून, कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
"जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे ऐकूण न घेता आकसापोटी त्यांचे अतिक्रमण सिद्ध करून ते पाडण्याचा कट कारस्थान गेल्या अनेक दिवसांपासून रचले गेले. बुऱ्हाणनगर देवीचे भक्त, उच्च (Court), सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अभिषेक भगत यांच्या मंगल कार्यालय असेच अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आले. ही सर्व कारवाई सकाळी गुंडाराजपध्दतीने शंभर दीडशे पोलिसांमध्ये करण्यात आली. या कारवाईत काही गुंडप्रवृत्तीचे लोकही तोंड बांधून सहभागी होते", असा आरोप खासदार लंकेंनी केला.
एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे काम करतो, हे सांगायचे आणि दुसरीकडे 2100 वर्षांपूर्वीच्या पालखीची तोडफोड करायची, असा सत्तेचा गैरवापर करण्यात येत असून यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून तक्रार केल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. नगर तालुक्यातील वडगांव गुप्ता इथल्या आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंब 50 वर्षांपासून वास्तव्यास आहे. कायद्याचा दुरुपयोग करून या आदिवासी बांधवांच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोपही खासदार लंकेंनी केला.
विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे काम केले नाही, अशा लोकांना ठरवून टार्गेट केले जात आहे. त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकूण न घेता त्यास त्रास दिला जात आहे. त्यांचे राहते घर, व्यवसायाचे ठिकाण जमिनदोस्त करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबले नाहीत, तर आम्हाला ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. वेगळयापध्दतीने समाजाला वेठीस धरले जाणार असेल, तर त्यांना धडा शिकविण्याची ताकद आमच्यात आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टीला प्रखर विरोध करतील, असा इशारा देखील खासदार लंके यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.