Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा प्लॅन, नगरसेवकांचा विरोध टाळण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाची नवी खेळी

Nashik Kumbh Mela Meeting : गत महिन्यात झालेल्या बैठकीत अधिकारी उशिरा पोहचल्याने नगरसेवकांनी प्राधिकरणाच्या नियोजनावर संताप व्यक्त केला. बहुंताश नगरसेवक निघून गेले. त्यानंतर आता पुन्हा या बैठकीचे नियोजन करण्यात येत आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik KumbhMela Meeting : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने सुरु असलेल्या विविध कामांबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे. खरेतर मागच्याच महिन्यात त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीला नगरसेवक येऊन बसले मात्र, अधिकाऱ्यांना येण्यास उशीर झाला. तोपर्यंत बहुंताश नगरसेवक रागात निघून गेल्याने कामांचे सादरीकरण होऊ शकले नाही. नगरसेवकांनी भाजप शहराध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली होती.

त्यानंतर कुंभमेळा प्राधिकरणावर नगरसेवकांनी रोष व्यक्त केला. पुन्हा बैठक बोलावली जात नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता कुंभमेळा प्राधिकरणाने नगरसेवकांची पुन्हा बैठक बोलावण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, आधीच्या बैठकीतील अनुभव लक्षात घेता बैठकीत वाद वाढू नये यासाठी कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कामाचे सादरीकरण करण्याची खेळी प्रशासनाकडून खेळण्यात येणार आहे.

कुंभमेळ्याची तयारी सुरु असून त्या निमित्ताने शहरात विविध कामे सुरु आहेत. त्याबाबत प्राधिकरणाकडून नगरसेवकांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे. तसेच कुंभ कामांबाबत नगरसेवकांच्या सूचना जाणून घेण्याची भूमिका प्राधिकरणाने घेतली आहे. महासभेत नगरसेवकांनी कुंभ कामकाजाबात अधिक माहिती देण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक आयोजित केली देखील होती. परंतु मागच्या बैठकीत झालेला गोंधळ व नाराजी पाहाता प्राधिकरण यावेळी वेगळी युक्ती वापरण्याच्या तयारीत आहे.

Girish Mahajan
Sunetra Pawar : आपल्या वहिनी आहेत ना ! सुनेत्रा पवारांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात नाशिकच्या अधिवेशनातून होणार, तारीख ठरली

बैठकीत कुठलेही राजकारण होऊ नये. तसेच नगरसेवकांकडून होणारा संभाव्य विरोध टाळण्यासाठी प्राधिकरणाने आता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे नियोजन सुरु केले आहे. जेणेकरुन होणारा विरोध टाळता येईल तसेच कुठला वाद होणार नाही असे नियोजन केले जात असल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Girish Mahajan
Chhagan Bhujbal : कुंभमेळ्यात बाहेरच्यांना रेड कार्पेट, स्थानिकांवर मात्र...; भुजबळांनी पुन्हा एकदा ओढले ताशेरे

या बैठकीत नगरसेवकांकडून वेगवेगळे मुद्दे उपस्थितीत करुन प्राधिकरणाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. जसे की, कुंभ विकास आराखड्यात महापालिकेने ६१ रस्त्यांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी आतापर्यंत २८ रस्त्यांनाच मंजुरी मिळाल्याने उर्वरित रस्त्यांचे काय, असा सवाल नगसेवकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पांबाबत प्राधिकरणाची भूमिका काय आहे, कोणत्या कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि कुंभमेळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, याचे स्पष्टीकरण नगरसेवकांकडून मागितले जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com