Girish Mahajan Politics: 'संकटमोचक' गिरीश महाजनांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात लागणार कस! काय आहे कारण..?

Loksabha Election 2024 : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे होती.
Girish Mahajan
Girish MahajanSarkaranama

Jalgaon News : जळगाव आणि रावेर लोेकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत राज्यात चांगलाच चर्चेत राहिला. विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापत स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली.तर दिल्लीतून सूत्रे फिरल्यानंतर रावेरमधलं रक्षा खडसेंचं आधी अडचणीत असलेली उमेदवारी पक्की झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन विधानपरिषदेची आमदारकी मिळवलेल्या एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश रखडलेला असतानाही सुनेचा प्रचार केला.

पण आता भाजपसह महायुतीचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेल्या मंत्री गिरीश महाजनांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात कस लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा न झाल्याने आधी सोपी वाटत असलेल्या लढत नंतर कठीण बनली.

भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी होती. यामध्ये जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ पक्ष व महाजन यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे आहेत.

Girish Mahajan
Sasoon Hospital News: चौकशीला किती वेळ लागेल सांगू शकत नाही? चौकशी समिती संशयाच्या फेऱ्यात

जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी यंदाची निवडणूक भाजपला सुरुवातीला सोपी होती. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे आणि नेत्यांतील असंतोष यातून ती अवघड बनत गेली. परिणामी शेवटच्या टप्प्यात येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाजप (BJP) पुढे मोठे आव्हान निर्माण केले. हे आव्हान पक्षाबरोबरच ग्राम विकास मंत्री महाजन यांच्यासाठीही होते.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांचा विविध भाजपाचे आमदार यांचा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वर्चस्व राहिला आहे. या जिल्ह्यातील बहुतांश सत्ता पदे भाजपकडे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान होण्याआधी देखील जळगावच्या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या लाटेमुळे गेल्या दोन निवडणुकांत भाजपने हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने आपल्याकडे ठेवले. यंदा मात्र परिस्थिती आणि राजकारण दोन्हींमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात 25 सभा घेतल्या. मात्र जळगाव मध्ये एकही सभा झाली नाही. त्यामुळे महायुतीचे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील, अनिल पाटील तसेच गिरीश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मोदी यांची सभा नसल्याने भाजपचे हे मतदार संघ शाबूत ठेवणे याचे श्रेय या नेत्यांकडे जाणार आहे. त्यामुळे या नेत्यांनी अतिशय झोकून देऊन काम केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये जळगाव व रावेर मतदारसंघासाठी सभा झाली होती. या शब्दांमुळे भारतीय जनता पक्षाला अनुकूल वातावरण झाले. यंदा जळगाव मतदार संघात उमेदवारी नाकारल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आपले सहकारी करण पवार यांना त्यांनी शिवसेनेचे उमेदवारी मिळवून दिली. करण पवार यांची जबाबदारी खासदार पाटील यांनी स्वतः घेतली.

Girish Mahajan
Nandurbar Lok Sabha Analysis : मोदी लाटेशिवाय हिना गावित हॅटट्रिक करणार? काय सांगतात मतदानाचे आकडे...

खासदार पाटील यांना भाजपचे राजकारण आणि निवडणूक जिंकण्याचा फंडा चांगलाच माहीत आहे. त्यांनी जोरदार आव्हान उभे केले त्यामुळे मंत्री महाजन यांना पूर्णवेळ या मतदारसंघात अडकून पडावे लागले. त्यामुळे यंदाच्या जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विद्यमान जागा राखणे हे भाजपला आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Girish Mahajan
Narendra Modi News : ना उत्तर प्रदेश, ना महाराष्ट्र, ना गुजरात; 'या' राज्यात भाजपला मिळणार मोठं यश; मोदींची भविष्यवाणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com